AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांच्या बॅरेक बाजूलाच लंडनचा ‘तो’ पाहुणा राहणार होता?; संजय राऊत यांची ‘जेल डायरी’

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना' वृत्तपत्राच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात त्यांना जेलमध्ये आलेल्या अनुभवाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या लेखात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या बॅरेकच्या बाजूला एक स्पेशल बॅरेक बनवण्यात आलं होतं. त्या बॅरेकमध्ये लंडनचा पाहुणा येणार होता, असं संजय राऊत आपल्या लेखात म्हणाले आहेत.

राऊतांच्या बॅरेक बाजूलाच लंडनचा 'तो' पाहुणा राहणार होता?; संजय राऊत यांची 'जेल डायरी'
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 08, 2023 | 5:29 PM
Share

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आर्थर रोड कारागृहात आलेल्या अनुभवाविषयी लेख लिहिला आहे. त्यांनी ‘सामना’च्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हे सदर लिहलेले आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगात आलेले अनुभव लिहले आहेत. त्यांच्या तुरुंगातील अनुभवांचा आगामी पुस्तकात देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी या लेखात जेल प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी आपल्या लेखात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. संजय राऊत आर्थर रोड कारागृहातील ज्या बॅरेकमध्ये कैद होते त्याच्या बाजूलाच लंडनच्या एका खास पाहुण्यासाठी बॅरेक बनवण्यात आलं होतं. याबाबत राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

“आर्थर रोड कारागृहात ज्या बॅरेकमध्ये होतो त्याच्या बाजूला एक विशेष बॅरेक बनवण्यात आली होती. ही बॅरेक खास बनवून घेतली होती आणि त्याची रोज साफसफाई करुन व्हिडीओ चित्रीकरण केले जात होते. लंडनवरून एक पाहुणा आलाच तर त्याच्यासाठी ही वेगळी व्यवस्था असे सांगण्यात आलं होतं. त्या पाहुण्याचे नाव म्हणजे निरव मोदी”, असं संजय राऊत लेखमध्ये म्हणाले.

संजय रऊत नेमकं काय म्हणाले?

“निरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. आपल्याला मुंबईत पाठवू नये, अशी मागणी त्याने कोर्टात केली. कारण भारतातील तुरुंग अमानवी स्वरूपाच्या आहेत. त्यामध्ये कमालीची अस्वच्छता आणि त्यांना जणू छळ छावण्याचे स्वरूप आहे. त्यामुळे मला लंडन तुरुंगातच ठेवा, अशी मागणी निरव मोदीने याचिकेत केलीय”, असं संजय राऊत म्हणाले.

“या याचिकेनंतर लंडन कोर्टाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून येथील तुरुंग व्यवस्थेचा अहवाल मागवला. त्यात मोदीसाठी निर्माण केलेल्या खास कोठडीचं चित्रण पाठवले. ही कोठडी प्रशस्त आहे. यामध्ये स्वतंत्र टीव्ही बाथरूम आहे, पण ही व्यवस्था इतर कैद्यांसाठी नाही”, असा दावा संजय राऊतांनी केला. “आर्थर रोडला बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी आहे. निरव मोदी आला तर आपल्याला कंपनी मिळेल, असे मला वाटले होते, असंदेखील खासदार संजय राऊत लेखात म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?