AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्यावर आर्थर रोड कारागृहात ‘ती’ वेळ आली होती”, संजय राऊतांनी सांगितले विदारक अनुभव

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑर्थर रोड जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. कथित्र पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी संजय राऊत यांना अटक झाली होती. ते तीन महिने आर्थर रोड कारागृहात कैद होते. यावेळी त्यांना जेलमध्ये आलेल्या अनुभवावर राऊतांनी 'सामना'च्या दिवाळी अंकात लेख लिहिलाय. या लेखात राऊतांनी जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

माझ्यावर आर्थर रोड कारागृहात 'ती' वेळ आली होती, संजय राऊतांनी सांगितले विदारक अनुभव
| Updated on: Nov 07, 2023 | 4:53 PM
Share

दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी तीन महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं. संजय राऊत मुंबईतील आर्थर रोड जेल कारागृहात कैद होते. यावेळी त्यांना कारागृहात नेमका कसा अनुभव आला? या विषयी त्यांनी सविस्तर मत मांडलं आहे. संजय राऊतांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या दिवाळी अंकात सविस्तर लेख लिहिला आहे. यावेळी त्यांनी जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जेलमध्ये एकंदरीत व्यवस्थेत भ्रष्टाचार नाही, तर जेलमध्ये भ्रष्टाचार हीच एकमेव व्यवस्था आहे, असं संजय राऊत आपल्या लेखात म्हणाले आहेत. तसेच जेल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आपल्याला आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना किती विदारक अनुभव आले, याबाबत त्यांनी भाष्य केलंय.

“कोर्टाने एखाद्या कैद्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन तुरुंग प्रशासनाकडून होत नाही. मग ते आदेश वैद्यकीय सुविधांबाबत असो नाही तर जेवणाबाबत. जेलचे कारभारी त्यांच्या मर्जीनेच ठरवतात. तुम्हाला त्यांच्या व्यवस्थेपुढे शरण जावे लागते. संपूर्ण व्यवस्था देशभरातच भ्रष्ट आहे. पण इकडे एकंदरीत व्यवस्थेत भ्रष्टाचार नाही, तर जेलमध्ये भ्रष्टाचार हीच एकमेव व्यवस्था आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊतांनी अनुभवला विदारक अनुभव

“आर्थर रोडमध्ये अनेक कैदी पाण्यात ब्रेड किंवा चपाती भिजवून खाताना मी पाहिले. विशेषतः सलग सुट्टी येते त्या दिवसात संध्याकाळचे जेवण सकाळीच दिले जाते. सकाळी 10:30 ला वाढलेले जेवण रात्री आठपर्यंत आंबल्यासारखे होते. वास येतो. डाळ तर लगेच खराब होते. अशावेळेला पाण्यात ब्रेड किंवा चपाती भिजवून ती रात्र ढकलणे एवढेच हाती असते. माझ्यावर आणि अनिल देशमुखांवर काही वेळा ही वेळ आली. पण आम्ही त्याबाबत कोणतीही कुरकुर केली नाही. एकदा हल्दीरामची सुकी भेळ खाऊन आम्ही रात्रीचे जेवण उरकले. कारण घरून आलेले जेवण खराब झाले”, असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात सांगितलं आहे.

‘ब्रिटिशकालीन ‘जेल मॅन्युअल’च्या नावाखाली शोषण’

“तुम्हाला जेलमध्ये कोणत्या दर्जाचे जीवन व्यतीत करावे लागते ते तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. मग तुम्ही डॉक्टर असा, प्राध्यापक, विचारवंत, संशोधक असा. तुम्ही खरंच गुन्हेगार आहात की नाही, याचा आतल्या व्यवस्थेवर काहीच फरक पडत नाही. ब्रिटिशकालीन ‘जेल मॅन्युअल’च्या नावाखाली तुमचे शोषण सुरू होते”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

संजय राऊतांचे जेल प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप

“कैद्यांना रक्ताच्या नातेवाईकांना भेटण्याची मुभा असते. त्या हक्काच्या मुलाखतीपासून खाणे-पिणे, कपडे, फोनवर नातेवाईकांशी संवाद साधणे या सगळ्यात भ्रष्टाचार होत असतो. ‘अगर आप आर्थिक रूपसे कमजोर है, तो जेल आपके लिए यातनागृह है.’ असे रुपेश कुमार सिंह म्हणतो व ते सत्य मी स्वतः पाहिले, अनुभवले आणि अनेकांना यातनागृहात जगताना पाहिले”, असा दावा संजय राऊतांनी केलाय.

“कसाब, अबू जिंदाल, अबू सालेम हे आर्थर रोड तुरुंगात होते. त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था उत्तम होत असे. ते अतिरेकी असले तरी मानव अधिकाराचे सर्व लाभ त्यांना मिळत. जे इतर सामान्य कैद्यांना कधीच मिळत नाहीत. अनेक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कच्चे कैदी जेलमध्ये नरकयातना भोगत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊत कसाबच्या भूताबद्दल काय म्हणाले?

“अंधविश्वास आणि भूत-प्रेताच्या कहाण्या ऑर्थर रोडलाही धुमाकूळ घालतात. कसाबचे भूत निघते ही कथा आहेच. पण त्याच कसाबच्या बॅरेकमध्ये मी आणि अनिल देशमुख राहत होतो. मी सांगितले, कसाबला इथून पुण्याला नेले. तिथेच फासावर लटकवले. येरवडा कारागृहात त्याला गाडले. त्यामुळे त्याचे भूत तेथे असायला हवे. पुण्याहून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल? कसाबला प्रत्यक्ष पाहणारे अनेकजण तेव्हा येरवड्यात होते. ते कसाबच्या बाबतीत अनेक कथा-दंतकथा सांगत. पण त्याच कसाबच्या ‘यार्डा’त आमचा मुक्काम होता”, असं संजय राऊत म्हणाले.

“कसाबचे भूत शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. रात्र जागून काढल्या. पण कसाब दिसला नाही. यार्डामध्ये दिवे कधीच विझत नाहीत. लख्ख प्रकाशात भुते फिरकत नाहीत. आमच्या सारखे लोक सरकारला भुतासारखे वाटत असल्याने कसाबच्या कोठडीत आम्हाला डांबून ठेवले”, असं राऊत म्हणाले.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.