AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडद्यामागे हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, काय घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात आगामी काळात प्रचंड घडामोडी घडणार आहेत. त्या घडामोडींना आता सुरुवात होताना दिसत आहे. कारण उद्धव ठाकरे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत संजय राऊत हे देखील आहेत. या भेटीकडे सत्ताधारी पक्षांसह इतर विरोधी पक्षांचं देखील लक्ष असणार आहे.

पडद्यामागे हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, काय घडतंय?
| Updated on: Nov 07, 2023 | 5:18 PM
Share

दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीतील एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत. या तीनही नेत्यांमध्ये आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीवर राज्यातील आगामी काळातील महत्त्वाच्या घडामोडी अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप कसं करावं, कुणाला किती जागा द्यायच्या, याबाबत या तीनही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कुणाला कुठल्या जागा द्यायच्या, याबाबत अतिशय महत्त्वाची चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटीचं खरं कारण काय?

देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची एकजूट झालीय. या विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झालीय. या इंडिया आघाडीच्या तीन मोठ्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडल्या आहेत. पण त्यानंतर इंडिया आघाडीच्या फार बैठका पार पडल्या नाहीत. तसेच उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमधील संबंध ताणले गेले असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संबंध दृढ राहिले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केला जातोय.

आगामी निवडणुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद आवश्यक आहे, तो संवाद व्हावा यासाठी ठाकरे आणि पवार या दोन नेत्यांची आज भेट होत आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि प्रचार कसा करावा, याबाबत चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

‘या’ मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता

  • धारावी क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.
  • ग्रामपंचायत निवडणूक निकालात अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ठाकरे गट सहाव्या क्रमांकावर असल्याने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.
  • या भेटीत ओबीसी आणि मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.