850 जागा अचानक कशा उपटल्या? एवढी का फाटली होती? संजय राऊत यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊतांनी महिला आरक्षणाच्या ८५० जागांवरून प्रश्न विचारत, विधेयक आधीच मंजूर असताना आताच या जागा कशा अचानक निर्माण झाल्या, असा सवाल केला. 'सीजेपी' (काँग्रेस जिताओ पार्टी) च्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसला का चुचकारले, असे विचारत फडणवीसांना 'भाषण माफिया' देखील म्हटले.

850 जागा अचानक कशा उपटल्या? एवढी का फाटली होती? संजय राऊत यांचा हल्लाबोल
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 10:28 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार तेच सांगत आहेत. तेव्हा काय झालं ते सांगू नका. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालं होतं. ते आधी लागू करा. आताच 850 जागा कशा उपटल्या? असा सवाल करतानाच सीजेपी ही जर काँग्रेस जिताओ पार्टी आहे तर तुमच्या पंतप्रधानांची एवढी कशी फाटली होती? रात्री अपरात्री व्हिडीओ करून त्याच काँग्रेस जिताओ पार्टीला का चुचकारत होते? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर हल्ला चढवला होता. त्यावर बोलता संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस यांचं हे वारंवार सांगून झालंय. काल फडणवीस यांच्या व्यासपीठावर लोक झोपले होते. कोणी जांभया देत होते, काही आमदार डुलक्या काढत होते. त्यामुळे भोंगा नीट वाजवला पाहिजे. त्याला सूर लागला पाहिजे. सनई सारखा वाजला पाहिजे. जो आमचा वाजतो. एक आमदार झोपला. एक डुलक्या घेतो. हे भाषण माफिया आहेत. एक दीड तास बोलतात. किती बोललं पाहिजे सत्तेवरच्या लोकांनी. हे भाषण माफिया आहेत. ही भाषण माफियागिरी राज्याच्या हिताची नाही. तुमच्या बैठकीत बोलता ते ठिक आहे. तुम्हाला वाटतं अभ्यासपूर्ण बोलता तसं नाही, असं राऊत म्हणाले.

Loading...

आधी विधेयक मंजूर करा

महिला आरक्षण विधेयक बिल मंजूर झालं. त्यात हे का नाही? ते का नाही? ते सोडून द्या. ते बिल आधीच मंजूर झालंय ना? मग ते लागू करा. स्वत: त्यावेळी जे ट्विट केलं होतं ते वाचा. मोदींची भाषणं पाहा. आताच 850 जागा अचानक कशा उपटल्या? तेव्हा कुणी या जागांचा उल्लेख केला नव्हता. तुमच्या भाषण माफियागिरीला सर्व कंटाळले आहेत. जेनजी म्हणूनच पेटून उठले आहेत, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.

तेव्हा का चुचकारत होते?

मुख्यमंत्र्यांनी सीजेपीचा उल्लेख काँग्रेस जिताओ पार्टी असा केला. त्यावरूनही राऊत यांनी हल्ला चढवला. काँग्रेस जिताओ पार्टी असेल तर मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेतला? सीजेपी काँग्रेस जिताओ पार्टी असेल तर रात्री अपरात्री येऊन तुमचे पंतप्रधान त्या काँग्रेस जिताओ पार्टीला का चुचकारत होते? एवढी का फाटली होती? इन्स्टावर रिल्स करत होते. व्हिडिओ टाकत होते. तुमच्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा का घेतला? असे सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक वक्तव्य केली पाहिजे. तोंडाला येईल ते बोलू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us