देवेंद्र फडणवीस, खरे राम भक्त असाल तर माफी मागा… संजय राऊत यांची मोठी मागणी

राम मंदिराच्या दानपेटीची 105 वेळा चोरी झाल्याचे एसआयटी अहवालातून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी चोऱ्या झाल्याचे नाकारले होते. आता सत्य समोर आल्याने संजय राऊत यांनी फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस, खरे राम भक्त असाल तर माफी मागा... संजय राऊत यांची मोठी मागणी
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 11:08 AM

राम मंदिराच्या दानपेटीची 105 वेळा चोरी झाल्याचं सरकारच्या अहवालातच स्पष्ट झालं आहे. आम्ही जेव्हा त्यावर बोलत होतो तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीस आमच्यावरच आरोप करत होते. चोरी झालीच नाही म्हणून सांगत होते. आम्ही राम मंदिराची बदनामी करत असल्याचा आरोप करत होते. आता सरकारने नेमलेल्या एसआयटीचा अहवाल आला आहे. त्यात सर्व आढळून आलं आहे. त्यामुळे खरे राम भक्त असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राम मंदिराचा अहवाल आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. 105 वेळा राम मंदिराच्या दानपेटीची चोरी झाली. मला आश्चर्य वाटतं फडणवीस सारखे महाअंधभक्त आम्हाला सल्ला देत होते. बदनामी करू नका, चोरी झाली नाही, असं फडणवीस सांगत होते. आता एसआयटी स्थापन झाली, गुन्हे दाखल झाले. आरोपींना अटक केली. कबुलीजबाब आला आहे. एसआयटीच्या आरोपपत्रात 105 वेळा दानपेटी फोडल्याचं सांगितलं गेलंय. फडणवीस हे खरे रामभक्त असेल तर त्यांनी आता माफी मागितली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

चोरांना पाठी घातलं

देवेंद्र फडणवीस चोरांना पाठिशी घालत होते. आताही घालत आहेत. महाराष्ट्रातील आणि अयोध्यातील चोरांना पाठिशी घालत आहेत. आम्ही सांगत होतो तेव्हा फडणवीस तावातावाने आमच्या विरोधात बोलत होते. आम्हाला खोटं ठरवत होते. आम्ही खोटं बोलत आहोत म्हणून सांगत होते. आता सरकारनेच नेमलेल्या एसआयटीच्या अहवालात काय आलं? 105 वेळा तुमच्या कााळात राम मंदिर लुटलं गेलं. त्याबद्दल माफी मागा. याच मंदिरासाठी कारसेवा करायला गेले होते ना? आता आमच्यावर टीका केल्याबद्दलही माफी मागा, अशी मागणीच राऊत यांनी केली.

महाविकास आघाडी आंदोलन करणार

ज्येष्ठ नेते शरद पवार हे दुष्काळाची पाहणी करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने आंदोलन करत आहे. उद्धव ठाकरे संभाजीनगरला गेले. मी अकोल्यात गेलो, नांदेडला गेलो. आम्ही मराठवाड्यात आंदोलन करत आहोत. दुष्काळाच्या मुद्द्यावर सर्वजण एकत्र आले तर सरकारला झुकावं लागेल. आपल्या मागण्या मान्य करता येईल. पवारांना 87 वर्षाचे म्हणणं चुकीचं आहे. ते राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचे प्रमुख नेते आहेत. शेतीतील त्यांना जेवढं कळतं, तेवढं कळणारा नेता देशात नाही. मराठवाड्यात शिवसेनेचं आंदोलन आहे. भविष्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही या प्रश्नावर एकत्र आंदोलन करू, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us