AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव रागवणार नाही, संतापणार नाही, कुंभमेळ्याचा पैसा दुष्काळासाठी… संजय राऊतांची मोठी मागणी

लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी दुष्काळावर चर्चा करताना काजू बादाम खातात. झोपतात. सोशल मीडियावर खेळतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना समज दिली देऊन सोडून दिलं जाते, हे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

देव रागवणार नाही, संतापणार नाही, कुंभमेळ्याचा पैसा दुष्काळासाठी... संजय राऊतांची मोठी मागणी
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 10:49 AM
Share

कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री स्वत: दुष्काळाची परिस्थिती हाताळत आहेत. आपल्याकडे मात्र अजून चर्चाच सुरू आहे. शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही, असं सांगतानाच कुंभमेळ्यावर वरेमाप खर्च करू नका. कुंभमेळ्याचा काही निधी दुष्काळासाठी वळवा. देवालाही दुष्काळात सामील करा. देव काही रागावणार नाही. संतापणार नाही, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारने दिल्लीच्या पथकाची वाट न पाहता, केंद्राची परवानगी न घेता दुष्काळ जाहीर केला आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जाहीर केल्या. कर्नाटकाचे मुख्यमंत्री स्वत: दुष्काळाचं मॉनिटरिंग करत आहेत. महाराष्ट्रात अजून तीन पक्षाचा समन्वय नाही. कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालयाच्या भिंती फाडून आत जात नाही. शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि मंत्रालयावर धडकेल अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ब्र काढला जात नाही, असं संजय राऊत म्हणाले.

शक्तीपीठाचा खर्चही वळवा

कुंभमेळ्याचा खर्च कमी करा. कुंभमेळ्यासाठी 55 ते 60 हजार कोटींची गरज नाही. हे सर्व पैसे नाही तरी ठेकेदारांच्या घशात घालत आहात. दुष्काळ सुल्तानी संकट असेल तर आपण त्यात देवालाही सामिल करू. जेवढा आवश्यक आहे, तेवढाच खर्च कुंभमेळ्यासाठी करा. बाकीचे 30 ते 35 हजार कोटी दुष्काळ ग्रस्तांसाठी वळवा. शक्तीपीठाचा खर्च थांबवा. तोही खर्च ठेकेदारांचं धन होण्यासाठी आहे. देव अजिबात रागावणार नाही. देव अजिबात संतापणार नाही. याची गॅरंटी आम्ही देतो, असं राऊत यांनी सांगितलं.

दिव्यांचा खर्चही…

नाही तरी देवाच्या नावावर ते पैसे गुजरातचे ठेकेदार खाणार आहेत. किंवा मिंध्यांचे लोक खाणार आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने काही कार्यक्रम सुरू आहेत. दिवे लावण्याचे काम थांबवावं. तो शेकडो कोटीचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरा, अशी मागणीही त्यांनी केली.

कॅबिनेटचं लाइव्ह टेलिकास्ट करा

कॅबिनेटमध्ये दुष्काळावर चर्चा होईल असं वाटत नाही. मंत्री बाहेर येऊन जे सांगतात तेच खरं. आत काय कोण सांगतं हे कळत नाही. दुष्काळावर कॅबिनेट होणार असेल त्यात दुष्काळ हा चर्चेचा विषय असायला हवा. त्याचं लाइव्ह टेलिकास्ट व्हायला पाहिजे. जनतेला कळलं पाहिजे काय चर्चा झाली. फक्त दुष्काळावरच कॅबिनेट व्हावी. त्याचं लाइव्ह चित्रण व्हायला हवं. ते सर्व चॅनलच्या माध्यमातून व्हावे. मंत्रालय किंवा सह्याद्रीमध्ये ही बैठक होऊ नये. स्टेडियमसारख्या लहानश्या जागेत कॅबिनेट घ्या. पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथे बसण्यासाठी जागा द्या. सर्वांसमोरच चर्चा होऊ द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?