
महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट कोसळलं आहे. राज्य सरकार काल बांधावर आलं. पण मदतीवरून शेतकरी नाराज असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना सरकारने देऊ केलेली मदत तुटपूंजी वाटत आहे. शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं असतांना त्याला थिगळ कसं लावता येईल असा सवाल आहे. त्यावरून आज संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजितदादांवर जहरी टीका केली. त्यांनी लाडक्या बहिणीच्या आडून सरकार मदतीत हात आखडता घेऊ शकत नाही असा आरसा दाखवला. तर अजितदादांच्या पैशांचं सोंग आणता येत नाही या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
पाहणी दौरा हा भास
मंगळवारी अख्ख मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये होते. त्यांनी या दौऱ्यात शेतात जाऊन, गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावर खासदार राऊतांनी आज टीका केली.
मराठवाड्याच पाहणी दौरा भास आहे. गेले कधी पाहणी केली कधी? शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण घेतला कधी, असा सवाल त्यांनी या पाहणी दौऱ्यावर केला. 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं ? काय समजून घेतलं ? असा थेट सवाल राऊतांनी विचारला. पाण्याच्या बॉटल वर फोटो लावून होत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. मदतीचं आम्ही स्वागत करतो, असं एकनाथ शिंदेंच्या मदत कार्यावर त्यांनी मत मांडलं. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने काय केलं? कोणत पथक पाठवलं. शासनान हे मुर्दाड आहे, असा जहरी टोला त्यांनी लगावला.
तर सरकार चालवू नका
अजितदादांनी पैशांचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य केलं. त्यामुळे शेतकरी नाराज झाला. अशा बिकट स्थिती शेतकरी संताप व्यक्त करत आहे. त्यावर दादांच्या वक्तव्यावर विरोधक तुटून पडले आहेत. संजय राऊतांनी दादांवर संताप व्यक्त केला. पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, असा सल्लाच राऊतांनी दिला. यांच्या दारोडी खोरीमुळे ही वेळ यांच्यावर आली, असा घणाघात त्यांनी घातला.
उद्धव ठाकरे लातूरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत आज दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेता यांनी ठेवला नाही. का तर प्रश्न विचारतील विधानसभेत प्रश्न मांडतील. आम्ही करोना काळात आम्ही आमदार खासदार यांनी एक महिन्याच वेतन द्यावं. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये द्यायला सांगितलं भाजपने दिली नाही त्यांनी त्यावेळी PM केअर फंड मध्ये पैसे दिले.
SRA प्रकरणात खिशे तपासले पैसे पडतील. तुम्ही निवडणुकीवर खर्च करत आहात शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. संकट मोचक अफवा आहे. आमदार खासदारांना पैसे देण्यासाठी संकट मोचक असतात. गरीबांना द्यायचं झालं की हे दरोडेखोर बनतात. लडाख लेह हा भारताच्या सीमेचा भाग आहे. आणि तुम्ही सीमा शांत ठेवू शकत नसणार तर कसले विश्वगुरु, असा चिमटा त्यांनी काढला. चीन लडाख मध्ये घुसलं आहे. तुम्ही भारताच्या सीमेवरच राज्य शांत ठेवू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.