Sanjay Raut: दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपचं नाव घेत थेट तो आरोप…

Sanjay Raut on Disha Salian Aditya Thackeray: दिशा सालियान प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर मोठी तोफ डागली. आदित्य ठाकरे यांना याप्रकरणात ओढण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर पलटवार केला.

Sanjay Raut: दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपचं नाव घेत थेट तो आरोप...
संजय राऊत, दिशा सालियन, आदित्य ठाकरे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 17, 2026 | 12:21 PM

खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियान प्रकरणात भाजपवर निशाणा साधला. भाजप विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही पूर्ण केस राजकीय हेतूने प्रेरित आहे. वडील आधी बोलले होते की हत्या नाही अपघात आहे. आता इतक्या वर्षाने त्याचं मतपरिवर्तन का झालं? असा सवालही राऊतांनी केला. तर मोदींच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यावर ही त्यांनी कोपरखळी मारली.

शरद पवार, ममता बॅनर्जी, डीएमके, नवीन पटनायक या सर्वांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो भाजपविरोधात, या तानाशाहीविरोधात आवाज उठवेल, त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याविरोधात गलिच्छ राजकारण खेळण्यात येत आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली. दिशाची त्यांची ओळख नव्हती. तिच्याशी त्यांचा कधीही संबंध आला नाही. तरीही काही लोक त्यांना बदनाम करत आहे. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यात येत आहे. आम्ही लढायला तयार आहोत. आदित्य ठाकरे एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही सर्व या दडपशाहीविरोधात लढू असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तुमच्याकडे खरंच ठोस पुरावा असेल तर सीबाआयला द्या ना. ठाकरे कुटुंबामुळे काही मंडळी मोठी झालीत आणि काही लोकं या कुटुंबामुळे मोठी झाली आहेत. आता भाजपला खूश करण्यासाठी ते ठाकरे कुटुंबाविरोधात बोलत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मोदी यांचं वय निवृत्तीचं

मोदी यांचं वय निवृत्तीचं आहे. त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे. 75 वय हे काही देशाच नेतृत्व करणार वय नाही. आता या देशाच नेतृत्व योग्य व्यक्तीकडे सोपवण् हा त्यांचा संकल्प असायला पाहिजे. त्यांची प्रकृती कशी आहे माहित नाही. पण या देशाची प्रकृती बिघडली आहे, असा चिमटाही राऊतांनी काढला. त्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरात दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी गुजराती आणि मराठी भाषेत मोदींच्या कार्याचा गौरव केला. त्यावरून शिंदे हे गुजरातला गेले हे हास्यास्पद असल्याचा जोरदार टोला राऊतांनी लगावला. एकनाथ शिंदे यांचे मोदी हे नेते आहेत. त्यांचे ते पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचं मुख्यालय हे गुजरात आहे त्यामुळे त्यांना जावं लागत. मोदींना गुजरात शिवाय काय दिसत नाही. त्यांना या वेळी केंद्रात असायला हवं. त्यांनी दाखवून दिले आहे की माझे नेते बाळासाहेब नाही तर मोदी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

जरांगे आणि दुष्काळावरून टीका

फडणवीस यांनी खूप वेळ दुष्काळ मुक्तीची आश्वासनं दिली आहेत. 760 आतापर्यंत आश्वासन दिले आहेत. ती पूर्ण झाली नाही म्हणून हे आंदोलन आहे. मुख्यमंत्री काय बोलतात याकडे कोणी लक्ष ठेवत नाही. जर सरकारने समाधान केलं असेल आणि समाधान झाले असेल तर त्याच स्वागत आहे. कॅबिनेट मध्ये आक्रमक भूमिका मंत्री मांडतात आणि मग अंगलट आले की त्यांची चाटायला जातात बूट म्हणतोय मी. मग त्यांची चाटायला का गेले . सरकार हे दूटप्पी आहे, असा आरोप त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us