AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचं अख्खं भाषण नरेंद्र मोदी अन् भाजपला मजबूत करण्यावर…; संजय राऊत यांचा निशाणा

Sanjay Raut on Eknath Shinde Dasara Melava 2023 Azad Maidan : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला शिमगा मेळावा म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचा घणाघात; एकनाथ शिंदे यांचं अख्खं भाषण नरेंद्र मोदी अन् भाजपला मजबूत करण्यावर असल्याची संजय राऊत यांची टीका, वाचा सविस्तर...

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचं अख्खं भाषण नरेंद्र मोदी अन् भाजपला मजबूत करण्यावर...; संजय राऊत यांचा निशाणा
| Updated on: Oct 25, 2023 | 11:58 AM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : दादरमधील शिवाजीपार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. हा शिमगा मेळावा असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तसंच मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिमगा हा हिंदू सण नाही का?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

शिमगा हा हिंदूंचा सण नाही का? शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. महाराष्ट्रातील उत्सवाचा मोठा भाग आहे. तुम्हाला नको हा उत्सव नको आहे का? होळी, दिवाळी सण नको आहेत का? नवीन सण संघ परिवाराने आणले आहेत आणि ते तुम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहात का? शिमगा हा आमच्या धर्मात राजकारणात एक महत्त्व आहे. आम्हाला तुमच्या नावाने शिमगा करावाच लागतो, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.

2024 ला शिंदे गट सत्तेत नसणार. तुमच्या डोक्यात खाणेरडे किडे, भाजपने टाकले आहेत. कालचं अख्खं भाषण सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मजबूत करण्यासाठी होतं. काल भाड्याचे लोक आले होते. हे लोक भाजपने पाठवले होते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

आमच्यावर केली जाणारी टीका हा ठाकरे गटाचा जळफळाट आहे, अशी टीका शिंदेगटाकडून करण्यात येत आहे. त्याला राऊतांनी उत्तर दिलं. नक्कीच आमचा जळफळाट होत आहे. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्याची बदनामी केली जात आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे. जळफळाट होत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

या देशांमध्ये गेल्या दहा वर्षापासून जातिवाद ,धर्मवाद ,क्षेत्र वाद याला खतपाणी घालून राजकारण केलं जातंय. त्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. हे काम कोण करतंय? तर ते भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहे. हे स्वतः हमास आहेत. त्यांच्या डोक्यात हमास आणि धमास भरलेला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.