AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीची भाजपला साथ, संजय राऊत यांची परखड प्रतिक्रिया; म्हणाले…

नागालँडमध्ये प्रथम प्रयोग झाला असं नाही. यापूर्वीही असं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग हा नागलँडला झालाय. कारण त्या राज्याची गरज आहे. त्या राज्यात आणि सीमेवर घडामोडी घडत असतात.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीची भाजपला साथ, संजय राऊत यांची परखड प्रतिक्रिया; म्हणाले...
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2023 | 11:17 AM
Share

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीने नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र दिसणार आहेत. एकीकडी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भाजपविरोधात देशभर विरोधकांची मोट बांधत असतानाच नागालँडमध्ये मात्र वेगळा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या या निर्णयावरून सोशल मीडियातून ठाकरे गटाला डिवचले जात आहे. या सर्व घडामोडी असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नागालँडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली नाही. तिथे प्रादेशिक पक्ष आहे. त्या पक्षाचे नेते रिओ आहेत. ते खासदार होते. त्यांचा प्रादेशिक पक्ष आहे. त्यांना 25 ते 26 जागा मिळाल्या आहेत. ते सीमावर्ती राज्य आहे. संवेदनशील राज्य आहे. ते काश्मीरपेक्षाही संवेदनशील आहे. तिथेही दहशतवाद आणि इतर कारवायांचा धोका आहे. तिथे भाजपची रिओ यांच्यासोबत युती होती. भाजपला केवळ 10 किंवा 12 जागा मिळाल्या आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. त्या सर्वांनी मिळून सरकार बनवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार

नागालँडमध्ये प्रथम प्रयोग झाला असं नाही. यापूर्वीही असं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग हा नागलँडला झालाय. कारण त्या राज्याची गरज आहे. त्या राज्यात आणि सीमेवर घडामोडी घडत असतात. त्यामुळे तिथे राजकीय संघर्ष असू नये विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं टाकता यावीत. त्यामुळे असे निर्णय नागालँडबाबत घेतले जातात. हे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत आहे. नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षा विषयक परिस्थिती काश्मीरपेक्षा गंभीर आहे. नागालँडमध्ये सरकार भाजपचं नाही. तिथल्या प्रादेशिक पक्षाचं आहे. भाजप त्यांच्या सरकारमध्ये सामील झालंय इतर पक्षांबरोबर. महाविकास आघाडीची आज बैठक आहे. त्यात ही गोष्ट चर्चेला येईल, असंही ते म्हणाले.

मूळ शिवसेना जागेवरच

मनसेचा आज वर्धापन दिन आहे. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे सर्व लोक शिवसेनेतच होते. शिवसेना नसती आणि बाळासाहेब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो? याची उजळणी आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. मूळ शिवसेना जागेवर आहे. भाजपने विकली असली, कुणाच्या नावावर केली असली तरी मूळ शिवसेना जागेवरच आहे, असं ते म्हणाले.

कसं आहे बलाबल?

दरम्यान, नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात येणार आहे. एनडीपीपी या प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वात नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. एनडीपीपी आणि भाजपची निवडणुकीत युती होती. यात एनडीपीपीला सर्वाधिक जागा मिळाल्याने एनडीपीपी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीत एनडीपीपीने 25 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 12, रिपब्लिकन पक्षाने दोन, राष्ट्रवादीने 7 आणि नॅशनल पिपल्स पार्टीने 5 जागा जिंकल्या आहेत. तसेच 4 अपक्ष निवडून आले आहेत. जनता दलाला एक जागा जिंकता आली आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी आणि नागा पिपल्स फ्रंटला प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. विधानसभेत बहुमतासाठी 37 जागांची आवश्यकता आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...