‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं’, शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिवशी संजय राऊतांची भावना

'खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं', शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिवशी संजय राऊतांची भावना
संजय राऊत, खासदार, शिवसेना

आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते, असं संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut Balasaheb Thackeray

Yuvraj Jadhav

|

Jan 23, 2021 | 10:56 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग 30 बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. 50 वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut said he remember Balasaheb Thackeray on every day when going to Samana Office)

बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात…

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असं वक्तव्य केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

मराठी माणसांना गर्वानं बोलायला शिकवलं

मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस 50 वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी अनेक घाव सोसले. आमच्या शिवसैनिकांना त्यांनी घडवलं. मराठी माणूस यापुढील अनेक शतकं त्यांचं स्मरण करेल, असही संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी, नारायण राणे हे मुख्यमंत्री करुन दाखवलं.

शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष त्यावेळी सत्तेत होता, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्यामुळेच मनोहर जोशी आणि नारायण राणे हे दोन शिवसेना नेते मुख्यमंत्री झाले, असं राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेनं युती केली नसती तर भाजप महाराष्ट्रात गावागावात पोहोचलं नसतं.

भाजपला जे शिवसेनेवर जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. आम्ही अटल बिहारी वाजपेयींना आणि लालकृष्ण आडवाणी यांना भाजप विसरलं, असं आम्ही म्हणत नाही. राम मंदिराची लढाई बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात लढली. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी आणि वाणीतून सत्तापरिवर्तन करुन दाखवलं, असंही संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

Balasaheb Thackeray Statue | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकाच व्यासपीठावर

 मराठी माणूस ते हिंदुत्व, शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये काय काय बदललं?

(Sanjay Raut said he remember Balasaheb Thackeray on every day when going to Samana Office)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें