AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?, संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल; भाजपला डिवचले

सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?

नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?, संजय राऊत यांचा 'रोखठोक' सवाल; भाजपला डिवचले
नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?, संजय राऊत यांचा 'रोखठोक' सवाल; भाजपला डिवचले Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 25, 2022 | 7:42 AM
Share

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी जुन्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही झाली आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी जाहीर केले. नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता?, असा सवाल करत संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांची कानउघाडणी केली आहे.

दैनिक ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांची कानउघाडणी करतानाच भाजपलाही डिवचले आहे. ”देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही.” खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला आहे. पण चिडून, संतापून, आदळआपट करून काय उपयोग? खरगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा प्रतिवाद भारतीय जनता पक्षाने करायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राऊतांचे ‘रोखठोक’ सवाल काय?

खरगे यांनी भाजपचा कुत्रा काढला. त्या कुत्र्यावरून संसदेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते असलेले खरगे हे गेल्या आठ दिवसांपासून तवांगमधील चीनच्या घुसखोरीवर चर्चेची मागणी करीत आहेत. त्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा नाकारली जाते. पण खरगे यांनी ‘छू’ केलेल्या कुत्र्यावर मात्र भाजपचे मंत्री संसदेत खडाजंगी करतात.

अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, ”आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!”

सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?

गांधी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपिताच होते. त्यांच्या ‘राष्ट्रपिता’ पदवीस अनेक राजकीय विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. ‘या देशाला बाप नाही. असूच शकत नाही,’ असे ते म्हणत. प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या स्वातंत्र्य लढय़ातील सहभागाचा आहे. कोण सरदार व राष्ट्रपिता याचा नाही.

भारतीय जनता पक्षातील अनेक महाभाग उघडपणे म्हणतात, ‘देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर म्हणजे पंतप्रधानपदी मोदी आल्यावर मिळाले. त्यामुळे 2014 नंतर एक नवा भारत निर्माण झाला आणि त्या भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत!’ उद्या 2024 नंतर राज्यशकट बदलले तर नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्याच्या पदवीचे काय करायचे?

काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या लढ्याची ठिणगी टाकली. टिळकांपासून गांधींपर्यंत, नेहरूंपासून सरदार पटेल, सुभाषचंद्र बोसपर्यंत प्रत्येकाने त्यात आयुष्याच्या समिधा टाकल्या.

या स्वातंत्र लढय़ाच्या इतिहासात भाजप-संघ वगैरेंचे कोठे नामोनिशाण आहे काय? खरगे म्हणतात, निदान स्वातंत्र्य लढय़ातील तुमचा कुत्रा तरी दाखवा!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...