AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना अडवताय?, तुमची लायकी काय?; संजय राऊत यांनी थेट पोलिसांनाच ललकारले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मुंब्र्याला जाणार आहेत. शिवसेनेची शाखा गेल्या आठवड्यात बुलडोझर लावून पाडण्यात आले होते. त्या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज मुंब्र्याला येणार आहेत. मात्र, त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज अज्ञातांनी फाडल्याने ठाण्यात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पोलिसांनाच ललकारले आहे.

उद्धव ठाकरे यांना अडवताय?, तुमची लायकी काय?; संजय राऊत यांनी थेट पोलिसांनाच ललकारले
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2023 | 11:02 AM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यात जाणार आहेत. मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा चंग पोलिसांनी बांधला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पोलिसांनाच ललकारले आहे. तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवताय? तुमची लायकी काय? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे.

असंख्य शिवसैनिकांची इच्छा होती म्हणून उद्धव ठाकरे येत आहेत. आम्ही जावू. पण उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रोखलं आहे. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाण्यात दहशत निर्माण केली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तडीपार करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पोलिसांसमोरच पहाटेपर्यंत बॅनर्स फाडण्यात आले.

उद्धव ठाकरे यांना अडवायचं अशी पोलिसांची भूमिका आहे. आम्ही म्हणतो अडवा. अडवायची हिंमत असेल तर जरूर अडवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे. पोलिसांना फोन केला तरी पोलीस घटनास्थळी जात नाही. पोलीस कुणाच्या पे रोलवर आहात? पोलीस आयुक्तांनी सांगावं. तुम्ही कोणत्या गटाची चाकरी करत नाही. तुम्ही राज्याची चाकरी करत आहात, असंही ते म्हणाले.

कुणाची गुलामगिरी करत आहात?

आम्ही दिवाळी आनंदाने साजरी करत आहोत. तुम्हाला त्यात मिठाचा खडा टाकायचा का? तसं करायचं असेल तुम्ही जरूर अडवा. जे पोलीस आज आम्हाला अडवण्यासाठी हजारोच्या फौजफाट्याने कामाला लागले. ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला जात असताना कुठे होते? पोलीस कुणाची गुलामगिरी करत आहेत? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तुमचा मालक सत्तेत राहणार नाही

तुम्ही ज्यांची चाकरी करत आहात तो मालक 31 डिसेंबर रोजी सत्तेत राहणार नाही. राज्यात आणि केंद्रात बदल होणार आहे. 2024 मध्ये हा बदल होणार आहे. त्यामुळे जे शिवसैनिकांवर हात उचलत आहेत, शिवसैनिकांना नोटीसा बजावत आहेत त्यांनी स्वत:चं काय होईल हे पाहावं. मग ते प्रशासनातील लोक असतील त्याची पर्वा करणार नाही. अंगावर यायचं असेल तर या. तुमची लायकी काय? तुम्ही कोण आहात? तुम्ही उद्धव ठाकरेंना अडवताय?, असं ते म्हणाले.

लाजा वाटत नाही तुम्हाला?

पोलीस आयुक्तांना आव्हान आहे. आम्ही 4 वाजता आनंद नगर टोलनाक्यावर पोहोचत आहोत. हजारो शिवसैनिक स्वागत करतील. आम्ही मुंब्र्यात जाणार आहोत. मुंब्रा हा ठाण्याचा आणि महाराष्ट्राचा भाग आहे. कोण होते बुलडोजर फिरवणारे? कुणाच्या आदेशाने बुलडोजर फिरवला? लाजा वाटत नाही तुम्हाला? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा