मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु, संजय राऊत असं का बोलले? शंभूराज देसाई यांनी सांगितलं…

2024 च्या निवडणुकीतही युती भक्कम आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याची संजय राऊत यांना गरज नाही, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय.

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु, संजय राऊत असं का बोलले? शंभूराज देसाई यांनी सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 4:43 PM

मुंबई : राज्यातलं सरकार (Maharashtra Govt) येत्या १५ दिवसात बदलणार. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरु झाल्यात असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. यावरून शिंदे गटाच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावरच पलटवार केलाय. संजय राऊत यांना इथं बसून दिल्लीत काय सुरु आहे हे कसं कळतं? ते काय अंतर्यामी आहेत का, असा सवाल शंभूराज देसाईंनी केलाय. एकिकडे महाविकास आघाडी एकत्र राहिल की नाही, यावरून शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं असताना संजय राऊत हे शिंदे-भाजप युतीवर बोलतायत. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून, अशी स्थिती झाल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली…

संजय राऊत असं का म्हणाले?

दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आलाय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पण राऊत यांनी हे वक्तव्य नेमकं का केलं, याचं कारण शंभूराज देसाई यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकून राहिल नाही नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. महाविकास आघाडी स्थापन करताना शऱद पवार यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. त्याच पवार साहेबांना आता ही महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक लढेल की नाही, असं वाटत असेल … त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्यानेच त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वक्तव्यापासून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करायचं म्हणून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याचं वक्तव्य केलंय, असं शंभूराज देसाई म्हणालेत.

दोन वेळा विधानसभेत आम्ही 170 प्लसचं बहुमत शाबित करून दाखवलं आहे. अजून वाटत असेल तर विधानसभेत कोणत्याही आयुधाच्या माध्यमातून तुम्ही प्रस्ताव आणा. आता असा प्रस्ताव आला तर आम्ही 180-85 च्या पुढे बहुमत दाखवू. शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्रपक्ष एकत्र आहोत. युती भक्कम आहे. भाजपच्या मोठ्या नेतृत्वाने यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. 2024 च्या निवडणुकीतही युती भक्कम आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याची संजय राऊत यांना गरज नाही, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.