AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : बंडाच्याविरोधात प्रतिक्रिया यायला पाच दिवस का लागले? राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीनंतर शिवसैनिकांना आदेश?

बंडखोरीवर ज्यावेळी सवाल करण्यात आले त्यावेळी शिवसेनेत एवढी मोठी बंडखोरी झाली तरी या गोष्टीची नेत्यांना कल्पना कशी नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीप्रसंगी उपस्थित केला होता.

Uddhav Thackeray : बंडाच्याविरोधात प्रतिक्रिया यायला पाच दिवस का लागले? राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीनंतर शिवसैनिकांना आदेश?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 25, 2022 | 3:52 PM
Share

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) स्वत: आजारी आणि त्यांची तब्बत साथ देत नसतानाही ते या राजकीय मैदानात उतरले आहेत, तरतर दुसरीकडे भाजप पक्षही सक्रिय झाला आहे. शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षातील नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत सरकारविषयी चर्चा झाल्यानंतरच ही रणनीती ठरवण्यात आली आहे.

बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय संकट आता अधिकाधिकच गडद होत चालले आहे. आज पाचव्या दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील राजकीय डावपेचांना आता वेग आला आहे.

राजकीय संकटावर बैठकीत चर्चा

त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. कालच शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर सरकारवर आलेल्या या संकटाविषयी चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली. याबैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीच थेट शिवसेनेच्या नेतृत्वालाच अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

बंडखोरीबद्दल नेते अनभिज्ञ का

या बैठकीत बंडखोरीवर ज्यावेळी सवाल करण्यात आले त्यावेळी शिवसेनेत एवढी मोठी बंडखोरी झाली तरी या गोष्टीची नेत्यांना कल्पना कशी नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीप्रसंगी उपस्थित केला. शिवसेनेतून झालेली ही बंडखोरी धक्कादायक असल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी काही बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बंडखोर आमदारांपैकी काही आमदार हे आपल्याला एसएमएस करत असून त्याद्वारे ते आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर पुन्हा संपर्क करून पाठिंबा देतील अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादीचे गंभीर सवाल

1. शिवसेनेतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊन शिवसेनेचे नेतृत्व या बंडखोरीबद्दल अनभिज्ञ कसे राहिले? 2. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बैठकीला उपस्थित राहूनही नंतर नेते बंड करून गुवाहाटीला गेले हे राजकीय संस्कृतील बाधक आहे. 3. एवढी मोठी बंडखोरी होऊनही तळागाळातील कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद का आला नाही?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या  बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली बाजू राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रश्नांना आणि आपली बाजूही यावेळी मांडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला बंडखोर आमदारापैकी काही आमदारांचाही विश्वास दिला होता.

उद्धव ठाकरेंनीही बाजू मांडली

1. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे ज्यावेळी आमच्याकडे आले त्यावेळी त्यांनी दोन मुद्दे मांडले होते. पहिला मुद्दा हा होता की, पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपण विचार करावा तर दुसरा मुद्दा हा होता की, निधी आणि इतर विकासाच्या मुद्यावर आमदारांच्याच काही तक्रारीही त्यांनी सांगितल्या. यावर त्यांना मी एकच सांगितले की, भाजपसोबत जाणे मला मान्य नाही, मात्र निधीच्या मुद्यावर आपण नक्की चर्चा करू.

2. यावेळी बैठकीला उद्धव ठाकरे यांनी फक्त सवाल जवाबच उपस्थित केले नाहीत तर बंडखोर आणि गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांबद्दलह त्यांनी संताप व्यक्त केला.

3. या बैठकीत त्यांनी सांगितले की, बंडखोर आमदार लवकरच महाराष्ट्रात येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यापैकी काही आमदार पुन्हा आपल्याकड परत येतील, तर काही बंडखोर आमदार आपल्याबरोबर एसएमएसद्वारे बोलत असून त्यांच्याबरोबरही संवाद चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीलाही सांगितले की, काही आमदार हे परत येतील अशी आशा आपल्याला आहे असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

4.या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितले की बंडखोरीनंतर राज्यात कोणत्याही हिंसाचार किंवा हिंसात्मक निषेधाला विरोध दर्शवण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कायदेशीर बाबींसह इतर गोष्टींविषयी विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी