शिर्डी वाद : दोन मुद्द्यांनी शिर्डीकरांचं समाधान, वादावर तोडगा निघाल्याची भावना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिर्डीच्या शिष्टमंडळाने समाधान झाल्याचं म्हणत, आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली.

शिर्डी वाद : दोन मुद्द्यांनी शिर्डीकरांचं समाधान, वादावर तोडगा निघाल्याची भावना
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 4:48 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिर्डीच्या शिष्टमंडळाने समाधान झाल्याचं म्हणत, आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. शिर्डीचे भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीनंतर माध्यमांना (Shirdi Saibaba Birthplace dispute) माहिती दिली.  “शिर्डींच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत (Shirdi Saibaba Birthplace dispute) मांडली. शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले आहे”, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.

शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेंची प्रतिक्रिया

दरम्यान शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीही माध्यमांशी संवाद साधून, मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाबाबतचं आपलं विधान मागे घेतल्याचं सांगितलं. शिर्डीकर आणि पाथरीकरांचं समाधान होईल, अशी चर्चा झाल्याचं खासदार लोखंडे म्हणाले.

दोन मुद्यावरुन तोडगा

शिर्डी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी जन्मस्थळाबाबतचं वक्तव्य मागे घेतलं. तर पाथरीच्या तीर्थस्थळ विकासालाही निधी देण्याचं मंजूर करण्यात आलं. या दोन मुद्द्यावरुन आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका शिर्डीकरांनी जाहीर केली.

नेमका वाद काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा शंभर कोटींचा विकास आराखडा तयार आहे’ असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन शिर्डीकर आक्रमक झाले होते. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी बंदची हाक दिली. पाथरीच्या विकासाला विरोध नाही तर मुख्यमंत्र्यांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला, त्याला विरोध असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं.

साईंच्या जन्मभूमीच्या वादानंतर शिर्डीकरांनी कडकडीत बेमुदत बंदची घोषणा केली होती. रविवारी पहिल्या दिवशी शिर्डीत अगदी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे साईभक्तांची बरेच हालही झाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना बंद मागे घेत चर्चेसाठी बोलावलं. आज मंत्रालयात त्याच विषयी बैठक झाली.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.