आता महाराष्ट्र बंद होणार… ठाकरेंची शिवगर्जना; सेना भवनातून आदित्य ठाकरेंनी थेट…
Aaditya Thackeray News: दिल्लीनंतर मुंबईतही वातावरण तापले आहे. आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक झाले आहेत.शिवसेना भवनाबाहेर गोंधळ निर्माण झाला आहे.

दिल्लीनंतर आता मुंबईत वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. शिवाजी पार्कवर सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. मुंबई पोलीस समर्थकांची धरपकड करत आहेत. अनेकांना ताब्यात घेतले आहे. यानंतर शिवसेना भवनाबाहेर मोठा गोंधळ उडाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सेना भवनाबाहेर आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे.
मुंबईच्या सेना भवनाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य आणि तेजस ठाकरे आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. रस्ता बंद केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप झाला आहे. यामुळे सेना भवनाबाहेर मोठा राडा झाला आहे. यानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनात सहभागी झाले आहेत. सेना भवनाला छावणीचं स्वरूप आले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेने सरकार आणि ज्ञानेश कुमारांच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आता महाराष्ट्र बंद होणार. हे शांततेच चाललं होतं. मुद्दाम बिघडवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांची दादागिरी सुरू आहे. आता आम्ही शांत बसणार नाही. संपूर्ण मुंबई बंद पाडणार. अमित ठाकरेंना पण अटक केली आहे. आता मुंबई पोलिसांमुळे मुंबई बंद होणार. पोलीस शिवसेना भवनात शिरले आहेत, असं म्हणत ते आक्रमक झाले आहेत. हे आंदोलन अजून चिघळणार आहे. केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
यानंतर आदित्य ठाकरेंनी पोलिसांचं वाहन रोखलं होतं. शिवसेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आंदोलक घेऊन जाणाऱ्या वाहनाना आदित्य ठाकरेंनी रोखल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांना सोडण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईवर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. सेना भवनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेने ठिय्या दिल्याचे दिसून आले आहे. या ठिय्या आंदोलनात तेजस आणि आदित्य ठाकरे सहभागी आहेत. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. तसेच मुंबईत परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.
