AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेनेला ‘जय महाराष्ट्र’, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून […]

सेनेला 'जय महाराष्ट्र', डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत डॉ. कोल्हे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला होता.

कोण आहेत डॉ. अमोल कोल्हे?

शिक्षणाने डॉक्टर असलेले डॉ. अमोल कोल्हे हे मराठी सिनेमा, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील नामवंत अभिनेते आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांची मालिका खूप गाजली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेतही काम केले. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि अदराच्या स्थानी असलेल्या दोन्ही राजांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर नेमकेपणानं उभारण्याचे यशस्वी काम डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. कमी कालावधीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाली. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून त्यांची गणना होऊ लागली होती.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...