VIDEO: पेट्रोल-डिझेलवर 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले, तुमचं मन कुजकं आणि सडकं; संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 04, 2021 | 12:00 PM

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते. (shiv sena leader sanjay raut reaction on fuel price)

VIDEO: पेट्रोल-डिझेलवर 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले, तुमचं मन कुजकं आणि सडकं; संजय राऊतांचा हल्लाबोल
sanjay raut
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते, असं सांगतानाच मोठं मन दाखवायला मन मोठं लागतं. तुमचं मन कुजकं आणि सडकं आहे, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. लोकांची चेष्टा चालली आहे का? मोठं मन दाखवायला मन असावं लागतं. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. नंतर 50 रुपये कमी करायला हवे होते. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग पेट्रोल-डिझेलचे भाव 100 रुपयांनी वाढवले हे पण मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100 ते 150 रुपयांची दरवाढ करू शकतात. लोकं पेट्रोल पंपावर आता 15 रुपये आणि 20 रुपयाचं पेट्रोल घेत असतात. समोर मोदींचा फोटो असतो. मोदी त्यांना आशीर्वाद देतात. आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असं सांगत असतात. ठिक आहे. हे दिवसही जातील 2024 साली, असा चिमटा राऊत यांनी काढला.

दरवाढ कमी करण्यासाठी किती वेळा हरवावे लागेल?

संपूर्ण देशात पोटनिवडणुकात हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल? की पूर्णपणे पराभूत करावे लागेल? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल. 2024 नंतर हे दिवस येतील असं वाटतं, असं ते म्हणाले.

अमेरिकेकडे बोट दाखवायचं की फ्रान्सकडे?

आघाडी सरकार सारखं केंद्राकडे बोट दाखवत आहे, असा आरोप भाजप करत आहे. त्यावरही त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल ना. पेट्रोल-डिझेलचे भाव राज्य सरकार वाढवत नाही. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कुणाकडे बोट दाखवलं? त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का? तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना? भाजपचेच. तुम्हीच मायबाप ना? देशाचे धोरणात्मक निर्णय तुम्हीच घेता ना? मग बोट कुणाकडे दाखवायचं? अमेरिकेकडे दाखवायचं की बायडनकडे दाखवायचं? कुणाकडे दाखवायचं? की फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडे दाखवायचं? असा सवाल त्यांनी केला.

व्हॅट कमी करण्यास आघाडी सकारात्मक

इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत राज्य सरकारही सकारात्मक आहे. या संदर्भात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने लोकांच्या महागाई संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीतून केंद्राने बेहिशोबी पैसे कमावले. तुम्हाला पैसेही मोजता येणार नाही. 127 कोटी रुपये कमावले. हे त्यावेळचे आकडे. आता फक्त 5 रुपये कमी करत आहेत. 25 ते 30 रुपये कमी केले असते तर भाजप सांगते तसं मोठं मन दिसलं असतं. मोठ्या मनाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुमचं मन मोठं नाही. कुजकं आहे. सडकं आहे. दिवाळीला असे शब्द वापरू नये. पण नाईलाज आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

देगलूरमध्ये चारीमुंड्या चीत, बंगालमध्ये तृणमूलने उखडून फेकलं, दादरामध्ये भगवा फडकला, भाजपचं अध:पतन : राऊत

अश्विनची ‘तारीख पे तारीख’, 52 वी टी ट्वेन्टी विकेट घेण्यासाठी जवळपास 4 वर्ष, वाट पाहता पाहता धोनी मेन्टॉर बनला!

(shiv sena leader sanjay raut reaction on fuel price)