सुपारी फुटली! प्रताप सरनाईकांचा मुलगा, रणजीत पाटलांची मुलगी, लग्न ठरलं!

सुपारी फुटली! प्रताप सरनाईकांचा मुलगा, रणजीत पाटलांची मुलगी, लग्न ठरलं!

ठाणे: मनसे नेते राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाची धामधूम पार पडल्यानंतर, आता आणखी एका बड्या राजकीय घराण्यात सनई चौघडे वाजणार आहेत. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री, भाजप नेते रणजीत पाटील हे व्याही होणार आहेत. प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव आणि ठाण्याचे नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांचं आणि रणजीत पाटलांच्या कन्येचं लग्न ठरलं आहे. सरनाईक -पाटील कुटुंबात नुकताच कौटुंबिक पद्धतीने सुपारीचा कार्यक्रम पार पडला. लग्न जमवून साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा तर मे महिन्यात लग्न होणार आहे.

पूर्वेश सरनाईक हे ठाणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि युवासेनेचे सचिव आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

सध्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही याबाबतच वादावादी सुरु आहे. भाजपने युतीसाठी शिवसेनेकडे आग्रह धरला आहे, तर शिवसेनेने यापूर्वीच एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यातच सर्व्हेंच्या आकड्यांनी दोन्ही पक्षांची धाकधूक वाढवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष युती करणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र प्रताप सरनाईक आणि रणजीत पाटील यांनी कौटुंबिक युती मात्र जाहीर केली.

महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ 2 जागा, भाजपला देशात मोठा फटका: सर्व्हे  

देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहात आहे. युती आणि आघाडीच्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवलं आहे. तर भाजपनेही लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक एजन्सीचे सर्व्हे, ओपिनियन पोल जाहीर होत आहेत. या वर्षातील सर्वात ताजा ओपिनियन पोल व्हीडीपी असोसिएशनने केला आहे.

या ओपिनियन पोलमधील आकडे भाजपला धक्का देणारे आहेत. कारण 2014 च्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपला या निवडणुकीत तशीच कामगिरी करता येणार नाही, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

आकड्यातच बोलायचं झाल्यास, गेल्या निवडणुकीत 282 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 81 जागांचा फटका बसेल असा अंदाज व्हीडीपी असोसिएशनने वर्तवला आहे. म्हणजेच भाजपला 201 जागा मिळू शकतात, त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 271 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेसह मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ 2 जागा, भाजपला देशात मोठा फटका: सर्व्हे  

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI