महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ 2 जागा, भाजपला देशात मोठा फटका: सर्व्हे

मुंबई: देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहात आहे. युती आणि आघाडीच्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवलं आहे. तर भाजपनेही लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक एजन्सीचे सर्व्हे, ओपिनियन पोल जाहीर होत आहेत. या वर्षातील सर्वात ताजा ओपिनियन पोल […]

महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ 2 जागा, भाजपला देशात मोठा फटका: सर्व्हे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई: देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहात आहे. युती आणि आघाडीच्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवलं आहे. तर भाजपनेही लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक एजन्सीचे सर्व्हे, ओपिनियन पोल जाहीर होत आहेत. या वर्षातील सर्वात ताजा ओपिनियन पोल व्हीडीपी असोसिएशनने केला आहे.

या ओपिनियन पोलमधील आकडे भाजपला धक्का देणारे आहेत. कारण 2014 च्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपला या निवडणुकीत तशीच कामगिरी करता येणार नाही, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

आकड्यातच बोलायचं झाल्यास, गेल्या निवडणुकीत 282 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 81 जागांचा फटका बसेल असा अंदाज व्हीडीपी असोसिएशनने वर्तवला आहे. म्हणजेच भाजपला 201 जागा मिळू शकतात, त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 271 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेसह मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रात फडणवीस मॅजिक कायम व्हीडीपी असोसिएशनच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम असल्याचं दिसतंय. कारण महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी तब्बल 23 जागा भाजप जिंकेल असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. युतीशिवाय भाजपला या जागा मिळतील असा अंदाज आहे. दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसेल असा अंदाज आहे. कारण गेल्यावेळी तब्बल 18 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला केवळ दोन जागा मिळतील असा अंदाज आहे.

व्हीडीपी असोसिएशनच्या सर्व्हे

देशात लोकसभेच्या कुणाला किती जागा मिळतील ?

एकूण जागा- 542 एनडीए- 225 यूपीए – 167 इतर – 150

देशात लोकसभेच्या कुणाला किती जागा मिळतील? भाजपा- 201 (-81) काँग्रेस – 110 (+66) इतर – 231

महाराष्ट्रात कुणाला किती जागा? भाजप – 23 काँग्रेस – 12 राष्ट्रवादी – 08 शिवसेना – 2 इतर – 3

दक्षिण भारतात कुणाला किती जागा ?
...............................
एकूण जागा- 130
एनडीए- 12
यूपीए - 61
इतर - 57

दक्षिण भारतात कशी राहिल मतांची टक्केवारी ?
...................
एनडीए- 17 %
यूपीए- 41 %
इतर - 38 %
**********

पश्चिम भारतात कशी असेल मतांची टक्केवारी ?
...........................
एकूण जागा- 104
एनडीए   -  44%
यूपीए -     40 %
इतर -      11 %
..............................
पश्चिम भारतात कुणाला किती जागा मिळतील?
...................
एकूण जागा- 104
एनडीए- 58
यूपीए- 44
इतर- 02

पश्चिम भारतातली राज्य आणि लोकसभेच्या जागा
..........
महाराष्ट्र- 48 
गुजरात- 26 
राजस्थान - 25
.......................
महाराष्ट्रात लोकसभेच्या कुणाला किती जागा ?
..............................
भाजपा- 23
काँग्रेस - 12
राष्ट्रवादी- 8
शिवसेना- 02
इतर- 03

महाराष्ट्रात मतांची टक्केवारी कशी असेल ?
............................................
भाजपा- 40 %
काँग्रेस - 20.5 %
राष्ट्रवादी - 17 %
शिवसेना- 9.8 %
एमआयएम- 2 %
मनसे- 1.9 %
बीएसपी- 1.8 %

गुजरातमध्ये कुणाला किती जागा मिळतील?
.........................
एकूण जागा- 26
भाजपा- 020
काँग्रेस- 06

राजस्थानमध्ये कुणाला किती जागा ?
एकूण - 25
भाजपा- 12
काँग्रेस - 13
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.