..म्हणून बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर द्यायला उद्धव ठाकरे सेनेचा कडाडून विरोध, पेडणेकर आक्रमक

बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेचा आहे, या प्रस्तावाला विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. यावर आता किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

..म्हणून बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर द्यायला उद्धव ठाकरे सेनेचा कडाडून विरोध, पेडणेकर आक्रमक
kishori pednekar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 8:18 AM

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेचा आहे, या प्रस्तावाला विरोधकांनी तीव्र विरोध केला असून, या प्रस्तावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या  किशोर पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेत विरोधकांचा तीव्र आक्षेप आहे.  ​भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांवर मॉल उभारले जाऊन, बीएमसीच्या हातून त्या जागा कायमच्या जाण्याचा धोका आहे,  असं यावेळी किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या पेडणेकर? 

बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवर देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेचा आहे, या प्रस्तावावर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ​भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांवर मॉल उभारले जाऊन, बीएमसीच्या हातून त्या जागा कायमच्या जाण्याचा धोका आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  पूर्वी शिवसेना-भाजपची सत्ता असताना  १,००० कोटींचे अनुदान देऊन बेस्ट फायद्यात आणली होती, याचा आता भाजपला विसर पडला आहे.  कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळालीच पाहिजे, पण डेपो विकून निधी उभारणे हे कर्मचाऱ्यांना देखील पटणार नाही, असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

बीएसटीचे 24 डेपो हे 60 वर्षांसाठी लीजवर यांच्या भाषेत लिज साठ वर्षांसाठी आहे.  जर ते  60 वर्षांसाठी लीजवर दिले तर तिथे काही होऊ शकतं. उद्या तिथे मॉल देखील होऊ शकतो. त्याला आमचा विरोध आहे.  मुंबईच्या सर्व जागा तुम्ही जर अशा पद्धतीने भाडेतत्त्वावर देत आहात, पण त्या परत येत नाहीत. कारण 99 वर्ष 100 वर्ष त्या जागा बीएमसीला परत मिळालेल्या नाहीत.  आमचं म्हणणं आहे तुम्हाला बीएसटी फायद्यात आणायचीये तर त्यासाठी वेगळे प्रयत्न होणं गरजेचं आहे. आम्ही देखील प्रयत्न केले, त्यावेळी बीएसटी फायद्यात आली होती. बीएसटी वर्कर यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे हे सगळं मान्य आहे, पण याचा अर्थ सगळे डेपो विकून दुसऱ्यांना देऊन मग जर मिळणार असेल तर ते बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना देखील पटनार नाही, असं यावेळी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us