AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊत यांचे ट्विट…बकऱ्याचा फोटो…कोड वर्ल्डमध्ये कॅप्शन अन् दिल्लीतील संदेश…काय आहे अर्थ

अमित शाह यांच्या दौऱ्यावर राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शाह यांची भेट घेतली. त्याबाबत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे अमित शाह हे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचे काम अमित शाह यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना शाह यांना भेटावे लागणार आहे. त्यामुळे पुण्यात जावून त्यांनी चर्चा केली असणार, असे राऊत यांनी सांगितले

Sanjay Raut : संजय राऊत यांचे ट्विट...बकऱ्याचा फोटो...कोड वर्ल्डमध्ये कॅप्शन अन् दिल्लीतील संदेश...काय आहे अर्थ
संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 12, 2025 | 3:11 PM
Share

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. माध्यमांनी राऊत यांना त्या ट्विटचा अर्थ विचारला. त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिले. परंतु स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तुम्हीच अभ्यास करा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले राऊत

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटबाबत त्यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे. त्याला खटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याला सांगितले फार शहाणपण करु नको. गप्प बस. फक्त बे बे करत राहा, असे दिल्लीतून कोणीतरी त्या बकऱ्याला सांगितले आहे. त्या ट्विटवर खाली लिहिलेले ए सं शी गट लिहिले आहे, त्याचा अर्थ काय? असे विचारल्यावर राऊत म्हणाले, ते तुम्हीच शोधा.

राज्याच्या राजकारणात काही तरी होत आहे. ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे, असे राऊत यांनी म्हटले. हनुमान जयंतीचा उत्सवाबाबत ज्या शोभायात्रा निघाल्या आहेत त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. हनुमान जयंतीच्या शोभा यात्रा या पद्धतीने निघत नाही. चर्च, मशिदीसमोरुन कधी शोभायात्रा काढण्यात येत नव्हती. या माध्यमातून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यावर राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शाह यांची भेट घेतली. त्याबाबत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे अमित शाह हे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचे काम अमित शाह यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना शाह यांना भेटावे लागणार आहे. त्यामुळे पुण्यात जावून त्यांनी चर्चा केली असणार, असे राऊत यांनी सांगितले. तहव्वूर राणा याला आणण्याचे काम तत्कालीन काँग्रेस सरकारपासून सुरु होते. त्यामुळे राणा याला आणण्याचे श्रेय भाजपला नाही तर काँग्रेसलाच असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा