आधी मनसुबे उधळले, आता भाजपला मुंबई मनपातून हद्दपार करण्याचा महाविकास आघाडीचा चंग

| Updated on: Oct 06, 2020 | 4:31 PM

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष हे चारही पक्ष एकत्रित येऊन भाजपला मुंबई महापालिकेतूनच हद्दपार करण्याच्या तयारीत आहेत.

आधी मनसुबे उधळले, आता भाजपला मुंबई मनपातून हद्दपार करण्याचा महाविकास आघाडीचा चंग
Follow us on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला धक्का देण्याचे भाजपचे मनसूबे फोल ठरले. यानंतर आता भाजपचं लक्ष प्रभाग समिती निवडणुकांकडे लागलं आहे. सध्या शिवसेनेकडे 8, तर भाजपकडे 9 प्रभाग समित्या आहेत. येथेही शिवसेना-काँग्रेसची हातमिळवणी झाल्यास भाजपच्या हातातून प्रभाग समित्याही निसटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष हे चारही पक्ष एकत्रित येऊन भाजपला मुंबई महापालिकेतूनच हद्दपार करण्याच्या तयारीत आहेत (Shivsena Congress strategy in BMC committee election against BJP).

सध्या शिवसेनेकडे 8, तर भाजपकडे 9 प्रभाग समित्या आहेत. महापालिकेतील महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. बुधवारी (7 ऑक्टोबर) बेस्ट आणि सुधार समित्यांच्या निवडणुका आहेत. येथेही काँग्रेस शिवसेनेशी पडद्यामागून हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. असं असलं तरी त्यानंतर येणाऱ्या प्रभाग समिती निवडणुकाही महत्वाच्या ठरणार आहेत.

प्रभाग समित्या या स्थानिक प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. या प्रभाग समित्यांचे अध्यक्ष हा त्या विभागातील महापौरांच्या समकक्ष व्यक्ती मानला जातो. प्रभागांसाठी एक विशेष फंड देखील दिला जातो. 24 वॉर्डच्या मिळून एकूण 17 समित्या आहेत. सध्या भाजपकडे 9 प्रभाग समित्या आहेत. शिवसेनेकडे 8 प्रभाग समित्या आहेत.

महाविकास आघाडी धर्माला जागून शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले, तर भाजपकडे स्वत:च्या संख्याबळाच्या जोरावर केवळ ५ समित्याच उरणार आहेत. तर 6 व्या प्रभाग समितीसाठी (एस आणि टी वॉर्ड) टायची परिस्थिती निर्माण होईल. शिवसेनेला काँग्रेसचे बळ मिळून महाविकास आघाडीतील पक्षांना 12 प्रभाग समित्या मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

हेही वाचा :

BMC Committee Election | दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली, किरीट सोमय्यांचा बीएमसीवर हल्लाबोल

काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच

PHOTO | मुंबई महापालिकेत आवाज शिवसेनेचाच, समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला धोबीपछाड

Shivsena Congress strategy in BMC committee election against BJP