पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड घेतले;त्यासाठी सगळी रक्कम प्रवीण राऊतांनी दिली; ईडीने खरेदीची यादीच केली जाहीर

| Updated on: Aug 03, 2022 | 4:37 PM

पत्रा चाळ मनी लाँड्रिंग प्रकरणी मंगळवारीही मुंबईतील अन्य दोन ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात आली असून त्याप्रकरणीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. या दोन परिसरांपैकी एकामध्ये एचडीआयएल (हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानाचा समावेश आहे

पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड घेतले;त्यासाठी सगळी रक्कम प्रवीण राऊतांनी दिली; ईडीने खरेदीची यादीच केली जाहीर
Follow us on

मुंबईः पत्रा चाळ घोटाळ्याची (Patra Chaal Scam)  चौकशी करत असताना आता ईडीकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी 10 भूखंड खरेदी करण्यासाठी त्यांनी 3 कोटी रुपये रोख दिले होते. संजय राऊत यांनी प्रवीण राऊत (MLA Pravin Raut) यांच्याकडून ही रोकड मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रवीण हा संजय राऊतसाठी ‘फ्रंटमॅन’सारखा होता तसेच तो संजय राऊत यांना महिन्याला लाखो रुपये रोख पाठवत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाला मिळालेल्या माहितीत खासदार संजय राऊत यांना 10 भूखंड खरेदी करण्यासाठी 3 कोटी रोख दिल्याची माहिती मिळाली आहे.

पैसे प्रवीण राऊतांनी दिले

पत्रा चाळ घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाचा वापर अलिबागमधील किहीम बीचवर असलेल्या या 10 भूखंडांच्या खरेदीसाठी वापर करण्यात आला होता आणि ही रक्कम प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना दिली होती असेही ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक असून या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहे असल्याचेह ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्य दोन ठिकाणी छापे

पत्रा चाळ मनी लाँड्रिंग प्रकरणी मंगळवारीही मुंबईतील अन्य दोन ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात आली असून त्याप्रकरणीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. या दोन परिसरांपैकी एकामध्ये एचडीआयएल (हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानाचा समावेश आहे आणि दुसरा परिसर हा कंपनीचा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्टेटमेंट रिकॉर्ड

या प्रकरणातील संबंधित व्यक्तीलाही ईडीच्या कार्यालयात आणून त्याच्याही जबाबाची नोंद करण्यात आली आहे. त्याबरोबरच त्याचे तेच स्टेटमेंट रिकॉर्ड करण्यासाठी पुन्हा त्यांना बोलवण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला होता, ती व्यक्ती कंपनी आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत होती आणि त्यांच्या कंपन्यांचे बँक खातेही तिच व्यक्ती पाहत होती. मंगळवारी एचडीआयएलच्या दुसर्‍या ठिकाणाहूनही काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यानंतर त्याच ठिकाणची मंगळवारीही झडती घेण्यात आली.

प्रवीण राऊतांकडून मोठी रक्कम संजय राऊतांना

पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळालेले कोट्यवधी रुपये अनेक कंपन्यांमधून वळवण्यात आले आहेत. या प्रकरणात प्रवीण राऊत यांनी संजय राऊतांना रोख रक्कमही दिली असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिमांड अहवालात म्हटले आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून दरमहा लाखो रुपये मिळत होते, त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले आहे की, प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे 1.06 कोटी रुपये वळवले आहेत.

672 भाडेकरूंचे भवितव्य टांगणीला

संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करता पैसे उकळण्याचा कट रचला आणि त्या 672 भाडेकरूंचे भवितव्य, ज्यांची घरे 10 वर्षांपूर्वी पाडण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रवीण राऊत, एचडीआयएल आणि गुरुआशिष कन्स्ट्रक्शनशी संबंधित आणखी काही लोकांनाही चौकशीसाठी बोलवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी सध्या खरेदी केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या आणखी काही मालमत्ता एजन्सीच्या तपासाखाली आहेत मात्र, राऊत आणि त्यांच्या भावांनी त्याची मालकी नाकारली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.