Shivsena Operation Tiger: बंडखोर सेनेची घरवापसी? ठाकरे शिवसेनेची मोठी खेळी, त्या बैठकीवर खिळल्या नजरा

Shivsena Operation Tiger Uddhav Thackeray-Eknath Shinde: बंडखोर सेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाकरे सेनेच्या त्या एका खेळीने आजची बैठक निर्णायक ठरणार आहे. त्या बैठकीवर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shivsena Operation Tiger: बंडखोर सेनेची घरवापसी? ठाकरे शिवसेनेची मोठी खेळी, त्या बैठकीवर खिळल्या नजरा
ऑपरेशन टायगर, शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 18, 2026 | 8:38 AM

Shivsena Operation Tiger Uddhav Thackeray-Eknath Shinde: काल दिवसभर बंडखोरांनी उद्धव सेनेची डोकेदुखी वाढवली. फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वतंत्र गट म्हणून मंजूरी दिल्याचे वृत्त आले. तर कायदेशीर आयुध वापरून उद्धव सेनेने आज पक्षाच्या सर्वच 9 खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी व्हीप बजावला आहे. 11 वाजता आज दिल्लीत ही बैठक होत आहे. उद्धव सेनेने कायदेशीर भक्कम मोर्चेबांधणी केल्याने बंडखोर सेनेसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे सेनेसोबत किती खासदार आहेत हे आज समोर येईल. किती जणांची घरवापसी होते हे सुद्धा समोर येईल. तर किती जणांनी परतीचा दोर कापला हे पण उघड होईल. पण तोपर्यंत सस्पेन्स कायम आहे.

आज दुपारी 11 वाजता बैठक

ठाकरेंच्या खासदारांची आज बैठक बैठक होत आहे. या बैठकीला कोण कोण खासदार उपस्थित राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काल खासदार संजय राऊत यांनी या खासदारांसाठी एक शिवी हासडली आणि त्यानंतर मोठा गदारोळ उडाला. पक्षाकडून खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला कोण कोण खासदार हजेरी लावतील यानंतर शिंदे सेनेत कोण जाणार याचे चित्र स्पष्ट होईल.

खासदार संजय दिना पाटील बैठकीला जाणार

ईशान्य मुंबई चे खासदार संजय दिना पाटील दिल्लीला असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर संपूर्ण शांतता आहे. कालपर्यंत संजय दिना पतीला यांच्या घराबाहेर कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गर्दी पाहायला मिळत होती तर पोलीस बंदोबस्त देखील होता. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दिल्लीत संसदीय भवनात बैठक आयोजित करण्यात आलेले आहे यावेळी सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलवण्यात आलेले आहे. तर संजय दिना पाटील हे या बैठकीला उपस्थित राहतात का या प्रश्नावर त्यांनीच उत्तर दिले आहे. संजय दिना पाटील हे या बैठकीला हजर राहणार की नाही हे थोड्याच वेळात समोर येईल.

सुरक्षेसाठी बंडखोर दिल्लीबाहेर

ठाकरे गटाच्या सर्व 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही तांत्रिक गोष्टी अजून बाकी आहेत यासाठी खासदार यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने शिवसेनेची सावध भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. तर खासदार संजय जाधव यांच्या परभणीच्या निवास स्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जाधव यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

Follow Us