AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena: ऑपरेशन टायगरने सुरूंग लावलाच, 6 बंडखोरांचा गट स्थापन, शिंदेंच्या शिवसेनेत कधी होणार विलीन? मोठी अपडेट काय?

Operation Tiger UBT Shivsena Split: ऑपरेशन टायगर फत्ते झाले. सहा बंडखोर खासदारांनी एक स्वतंत्र गट स्थापन झाला आहे. त्याला लोकसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली आहे. आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की, हे सहा फुटीर खासदार शिंदे सेनेत कधी विलीन होणार? काय आहे याविषयीची अपडेट?

Shivsena: ऑपरेशन टायगरने सुरूंग लावलाच, 6 बंडखोरांचा गट स्थापन, शिंदेंच्या शिवसेनेत कधी होणार विलीन? मोठी अपडेट काय?
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 17, 2026 | 1:35 PM
Share

Rebel MPs Group will be merge in Shinde Shiv Sena: ऑपरेशन टायगर यशस्वी ठरले. सहा बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना कालच दिले होते. स्वतंत्र गट म्हणून त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिली. त्यामुळे उद्धव सेनेसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. तर सहा खासदारांचा हा गट शिंदे सेनेत कधी विलीन होणार याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. 19 जून रोजी शिवसेनेचे दोन्ही गट पक्ष वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यापूर्वीच उद्धव सेनेते उभी फूट पडली आहे. त्यामुळे दोन दिवसांनी हा गट शिंदे सेनेत विलीन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल

राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जाणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 10 जून रोजी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. यानंतर दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ऑपरेशन टायगर टप्प्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी बैठक घेतली. त्यालाही एक आमदार प्रत्यक्ष तर पाच आमदार व्हर्चुअली उपस्थित राहिले हे विशेष. कोणताही संशय येऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. पण अखेर ही बातमी फुटलीच आणि दिल्लीत रात्री मोठ्या घडामोडी घडल्या. आज फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश?

19 जून रोजी शिवसेनेतील दोन्ही गट वर्धापन दिन साजरा करणार आहेत. दोन्ही पक्षांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 60 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे घेणार आहे. 19 जून रोजी वर्धापन दिन साजरा होईल. त्यात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सेनेच्या 6 खासदारांचा पक्ष प्रवेश करून घेण्याची शक्यता आहे.  अजून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर उद्धव सेना सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. सहा बंडखोरांच्या गटाला मंजूरी देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याचे समजते. कोणताही गट दुसऱ्या पक्षात विलीन करता येत नाही, अशी भूमिका उद्धव सेनेने घेतली आहे.

कोण आहेत ते 6 खासदार?

संजय देशमुख, यवतमाळ

संजय जाधव, परभणी

संजय दिना पाटील, उत्तर पूर्व मुंबई

नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली

ओमराजे निंबाळकर, धाराशिव

भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी