AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा झटका… सहा खासदारांच्या गटाला मंजूरी? लोकसभा अध्यक्षांचा निर्णय काय?

Operation Tiger Shivsena : अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिल्याची बातमी समोर येत आहे. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा झटका... सहा खासदारांच्या गटाला मंजूरी? लोकसभा अध्यक्षांचा निर्णय काय?
उद्धव ठाकरे शिवसेनेत उभी फूट Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 17, 2026 | 12:40 PM
Share

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याविषयीचा अर्ज कालच लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याची मोठी माहिती समोर आली. तर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला मंजूरी (Operation Tiger Shivsena)दिल्याची माहिती समोर आली आहे. तर खासदार संजय राऊत हे तातडीने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या भेटीला पोहचले आहेत. या गटाला मंजूरी देण्यापूर्वी उद्धव सेनेची बाजू ऐकून घेण्यासाठीची विनंती ते करणार असल्याचे समजते.

लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजूरी

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 6 खासदारांनी अगोदरच अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी याासाठी हा अर्ज करण्यात आला होता. ओम बिर्ला तातडीने काल रात्री दाखल झाले. तर उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने चार पानी पत्र पाठवले होते. त्यात असा कोणताही स्वतंत्र गट स्थापन्यापूर्वी ,विलिनीकरणापूर्वी उद्धव सेनेची हरकत ग्राह्य धरण्याची विनंती करण्यात आली होती. पण बंडखोर खासदारांनी अगोदरच स्वतंत्र गटासाठी अर्ज केला होता. लोकसभा अध्यक्षांनी उद्धव सेनेच्या स्वतंत्र गटाला अगोदरच मंजूरी दिल्याने उद्धव सेनेचा उद्याच्या बैठकीसाठीचा व्हीपला किती महत्त्व उरलंय, असा सवाल केल्या जात आहे.

6 खासदारांचा शिंदे सेनेतील विलिनीकरणाचा मार्ग मोकळा

ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले आहे. सहा खासदारांनी कालच पत्र दिले आणि आज उद्धव ठाकरे यांनी व्हीप बजावला. त्यामुळे हा व्हीप लागू होत नसल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. तर आता खासदार संजय राऊत, खासदार अनिल सावंत, अनिल देसाई हे गेल्या 20 मिनिटांपासून लोकसभा अध्यक्षांच्या दालनात असल्याचे समजते. त्यांनी 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाला मंजूरी देण्यास विरोध दर्शवल्याचे समजते. तर 6 खासदारांचा शिंदे सेनेतील विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा खासदार केव्हा प्रतिक्रिया देणार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार आता केव्हा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देणार याची चर्चा रंगली आहे. संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील हे सहा खासदार आता मुंबईत शिवसेना वर्धापण दिनाला पक्ष प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं