Delhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले

दिल्लीमध्ये जे सुरू आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही असं म्हणत राऊतांनी दिल्लीतील आंदोलनाला केंद्राला जबाबदार ठरवलं आहे. यासंबंधी त्यांनी हिंदी भाषेतून एक ट्वीट केलं आहे.

Delhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले
पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते.
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 3:23 PM

मुंबई : आज एकीकडे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे तर दुसरीकडे देशभरात अनेक ठिकाणी कृषी कायद्याविरोधात आक्रमक आंदोलन सुरू आहे. या सगळ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जर सरकारला हवं असतं तर आजचा हिंसाचार थांबवता आला असता. दिल्लीमध्ये जे सुरू आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही असं म्हणत राऊतांनी दिल्लीतील आंदोलनाला केंद्राला जबाबदार ठरवलं आहे. यासंबंधी त्यांनी हिंदी भाषेतून एक ट्वीट केलं आहे. (shivsena sanjay raut on delhi Farmers Protest criticized on central government)

दिल्ली उफाळलेल्या आंदोलनावर संजय राऊतांनी ट्वीट करत सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, ‘जर सरकारला हवं असतं तर आजचा हिंसाचार थांबवता आला असता. दिल्लीत जे काही सुरू आहे त्याला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणालाही सहन होणार नाही. पण वातावरण का तापलं? सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? काय कोणी अदृष्य हात राजकारण करत आहे?’ असा थेट सवाल राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊतांनी ट्वीटमध्ये काय लिहिलं?

संजय राऊतांनी दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर हिंदी भाषेमध्ये ट्वीट केलं आहेत. त्यांनी लिहलं की, ‘अगर सरकार चाहती तो आजकी हिंसा रोक सकती थी. दिल्लीमे जो चल रहा है ऊसका समर्थन कोई नही कर सकता. कोई भी हो लाल किल्ला और तिरंगेका अपमान सहेन नही करेंगे. लेकीन माहोल क्युं बिगड गया?सरकार किसान विरोधी कानून रद्द क्युं नही कर रही?क्या कोई अदृश्य हात राजनीति कर रहा है?’

दरम्यान, नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. सर्व सहकार्‍यांना संयुक्त किसान मोर्चाने निश्चित केलेल्या मार्गावरच परेड करण्याचं आवाहन योगेंद्र यादव यांनी केलं आहे. वेगळ्या मार्गाने गेलात तर आंदोलनाला फक्त नुकसान होईल. त्यामुळे शांतता ही शेतकरी चळवळीची शक्ती आहे. जर शांतता भंग झाली तरच आंदोलनाचा त्रास होईल असं आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केलं आहे.

नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटी येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रोही बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. (shivsena sanjay raut on delhi Farmers Protest criticized on central government)

संबंधित बातम्या –

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

(shivsena sanjay raut on delhi Farmers Protest criticized on central government)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.