AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांचे मित्र आणि बॅचमेटची बिहारमध्ये धडाकेबाज कामगिरी, थेट कारवाया अन्..

आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. त्यातच आता त्यांच्या मित्राचीही जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. तुकाराम मुंढे यांच्या आयएएस मित्राकडून बिहारमध्ये धडाकेबाज कारवाया केल्या जात आहेत.

तुकाराम मुंढे यांचे मित्र आणि बॅचमेटची बिहारमध्ये धडाकेबाज कामगिरी, थेट कारवाया अन्..
Tukaram Mundhe
| Updated on: Oct 25, 2026 | 2:15 PM
Share

तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवायांचा धडाका लावला आहे. एफडीएकडून राज्यभरात जोरदार कारवाई केली जात आहे. हॉटेल, रेस्टारंट आणि भेसळखोरांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आता बिहारमध्ये 2005 चे आयएएस बॅचचे तुकाराम मुंढे यांचे मित्र आणि सरकारी कुमार रवी यांनीही जोरदार कारवायांचा धडाका लावला. जनआरोग्याच्या ध्येयासाठी त्यांच्याकडून या कारवाया केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्यापेक्षाही मोठे आव्हान कुमार रवी यांच्यापुढे आहे. तिथे फक्त कारवाई हाच मुद्दा नाही तर तेथील लोकांची जनजागृती हे मोठे आव्हान आहे. याबाबत तिथेल लोकांमध्ये जनजागृती जास्त प्रमाणात नाही. त्यामुळे तक्रारीच जास्त येत नाहीत. राज्यात ज्याप्रमाणे तपासणी केली जाते आणि कारवाई केली, जाते तसे बिहारमध्येही सुरू आहे. पण इथे लोक तक्रारी करतात, तिथे ते प्रमाण फार कमी आहे.

बिहारचे आरोग्य सचिन आणि अन्न सुरक्षा आयुक्त कुमार रवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू आहे. विशेष म्हणजे कुमार रवी आणि तुकाराम मुंढे एकमेकांचे मित्र आहेत. बिहारमध्ये लोकांमध्येच जनजागृती नसल्याने सर्रासपणे मुद्दत संपलेल्या गोष्टी विकल्या जातात. कुमार रवी यांनी एक पूर्ण सिस्टिम बदलण्याच्या दिशेने हे पाऊस उचलले आहे.

फक्त धाडीच टाकून आणि फोटो काढून नाही तर थेट अशा लोकांवर गुन्हेही दाखल केली जात आहेत. मोठ्या मोठ्या हॉटेलवरही त्यांनी धाडी टाकल्या आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’मोहिमेंतर्गत 4 ठिकाणी कारवाई केली आहे.

या कारवाईत खाद्यतेल, मसाले आणि खोबरे पावडरसह एकूण 21 लाख 72 हजार 669 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जुना मोंढा येथील जय मिश्री ट्रेडर्समधून 5 लाख 36 हजार रुपयांचे खाद्यतेल, चिकलठाणा MIDC येथील एल एम स्पायसेसमधून 98 हजार 400 रुपयांचे मसाले, नवीन मोंढा येथील बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला येथून 1 लाख 29 हजार 300 रुपयांची खोबरे पावडर, तर पंढरपूर येथील ओम श्रीनाथ इंडस्ट्रीजमधून 14 लाख 8 हजार 640 रुपयांचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.

Follow Us
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल