“नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी”, भेट म्हणून लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं ‘हे’ वचन

| Updated on: Aug 03, 2020 | 1:16 PM

लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Lata Mangeshkar wishes Narendra Modi on Raksha Bandhan).

नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी, भेट म्हणून लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं हे वचन
Follow us on

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या फोटोंचा एक व्हिडीओ ट्विट करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Lata Mangeshkar wishes Narendra Modi on Raksha Bandhan). तसेच हीच माझी राखी असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओत त्यांनी पंतप्रधान मोदींविषयीची आपली भावना व्यक्त करतानाच त्यांच्याकडून एक वचनही घेतलं आहे.

लता मंगेशकर म्हणाल्या, “आज राखी पोर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर मी तुम्हाला प्रणाम करते. राखी तर मी आज पाठवू शकले नाही. त्याचं कारण सर्व जगाला माहिती आहे. नरेंद्रभाई तुम्ही देशासाठी इतकं काम केलं आहे आणि इतक्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत की देशवासी ते विसरु शकणार नाही. आज भारताच्या लाखो कोट्यावधी महिला तुम्हाला राखी बांधण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांना राखी बांधणं शक्य नाही. तुम्ही हे समजू शकता. या राखीच्या दिवशी तुम्ही वचन द्या की तुम्ही देशाला आणखी उंचीवर घेऊन जाल.”


लता मंगेशकर यांच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रतिसाद दिला आहे. मोदी म्हणाले, “लता दीदी, रक्षाबंधनानिमित्त तुमचा हा भावपूर्ण संदेश खूप प्रेरणा आणि ऊर्जा देणार आहे. कोट्यावधी माता-बहिणींच्या आशिर्वादाने आपला देश सातत्याने नव्या उंचीवर जाईल. नवं यश संपादन करेल. तुमचं आरोग्य चांगलं रोहो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराकडे माझी प्रार्थना.”

दरम्यान, आध्यात्मिक गुरु माता अमृतानंदमयी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर देवाची कृपा असल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या, ” नरेंद्र मोदींवर देवाची कृपा आहे. सध्या आपल्या देशावर शेजारी राष्ट्रांकडून युद्धाचं सावट आहे. दुसरीकडे देशात साथीच्या रोगाने देखील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर त्रास होतो आहे. अशा स्थितीत ईश्वर पंतप्रधान नरेंद्र मोदींना योग्य निर्णय घेण्यासाठी कृपा करेल. हे रक्षाबंधन मोदींना सुरक्षा प्रदान करो. जेणेकरुन ते देशाची सुरक्षा निश्चित करु शकतील.”


अमृतानंदमयी यांच्या या ट्विटवरही मोदींनी उत्तर देत त्यांचे आभार मानले.

हेही वाचा :

Rakshabandhan | सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन

Lata Mangeshkar wishes Narendra Modi on Raksha Bandhan