Rakshabandhan | सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन

सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली.

Rakshabandhan | सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 12:05 PM

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. (NCP MP Supriya Sule Deputy Chief Minister Ajit Pawar Rakshabandhan Celebration in Mumbai)

सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर रक्षाबंधनाचे लाईव्ह शेअर केले आहे. सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे. पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र जमून मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे सण-उत्सव साजरे करतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्याला कात्री लावावी लागली. अजित पवार यांच्या वाढदिवशी सर्व बहिणींनी त्यांचे ऑनलाईन औक्षण केले होते.

“कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे” अशा भावना अजित पवार यांनी सकाळीच ट्विटरवरुन व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा : VIDEO : ‘आता अजित पवारांबाबत महत्त्वाची बातमी!’ स्टुडिओमध्ये सुप्रिया सुळे न्यूज अँकरच्या भूमिकेत

(NCP MP Supriya Sule Deputy Chief Minister Ajit Pawar Rakshabandhan Celebration in Mumbai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.