अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटेचा ईडीकडे जबाब, सूत्रांची माहिती

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटेचा ईडीकडे जबाब, सूत्रांची माहिती
Sitaram Kunte_Anil Deshmukh
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:11 AM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सिताराम कुंटे यांचा जबाब 7 डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता. अनिल देशमुख यांच्या कडून अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती कळतेय. सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढू शकतात. पोलीस बदल्यांसाठी अनिल देशमुख अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाब म्हटलं होत, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे, असं कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं कळतंय.

यादी नाकारता येत नव्हती

अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्यानं यादीला नाकारत नसल्याचं कुंटे यांनी म्हटल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख सध्या100 कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात आहेत. राज्य सरकारनं नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर देखील सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं बातमी प्रकाशित केली आहे.

पाहा व्हिडीओ

 ती नावं अंतिम करावी लागायची 

अनिल देशमुख वेळोवेळी त्यांच्या माणासांकडून अनधिकृत यादी पाठवायचे. त्यांच्या अधीन काम करत असल्यानं ती यादी नाकारु शकत नव्हतो. त्यातील काही नावं अंतिम यादीत असायची, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याचं कळतंय.

परबमीर सिंग यांच्या आरोपानंतर चौकशी सुरु

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा दावा केला होता. यापत्रानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनं कारवाई सुरु केली होती. अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत.

भाजप आक्रमक होण्याची शक्यता

सिताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबाची माहिती माध्यमांतून प्रकाशित झाल्यानंतर भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या: 

Sambhaji Bhide | लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणाऱ्या न्यायाधीशाला संपवलं पाहिजे :संभाजी भिडे

Video | अंनिसमधील वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा आरोप

Sitaram Kunte told ED in his statement that Anil Deshmukh sent unofficial list of Police officer transfer via their people

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.