…तर या रस्ते घोटाळ्याची सखोल चौकशी करू; आदित्य ठाकरे यांनी दिला इशारा, बीएमसीविरोधात फुंकलं रणशिंग

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 6:51 PM

दाओसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. त्यावर दोन ते अडीच कोटी रुपये खर्च झाले असतील. हा खर्चसुद्धा राज्यावर आला आहे. हा खर्च ते एमआयडीसी किंवा उद्योग खात्यातून दाखवतील.

...तर या रस्ते घोटाळ्याची सखोल चौकशी करू; आदित्य ठाकरे यांनी दिला इशारा, बीएमसीविरोधात फुंकलं रणशिंग
आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. मुंबईत ४०० किलोमीटरचे रस्ते शक्य आहेत का, असा सवाल यावेळी त्यांनी केला. ४८ टक्केपेक्षा जास्त किमतीत कंत्राटदारांना काम देण्यात आलं. पाच कंत्राटदारांना पाच काम कशी मिळाली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला. बीकेसीमध्ये मोठा कार्यक्रम झाला. रात्री साडेदहा वाजता ते पत्रक काढण्यात आलं. हे पत्रक फार महत्त्वाचं आहे. बीएमसीनं (BMC) उत्तर दिलं. निगोसीएशनला बोलावलं. पण, कंत्राटदारांना टेंडर प्रक्रिया न राबविताना कंत्राट दिलं आहे. याचा अर्थ कुठंतरी घोटाळा आहे. कारण बीएमसीनं ठरविलं आणि काम दिली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

या रस्त्यांच्या कामासाठी आणखी कुणी येतात की, नाही, हे बीएमसीनं ठरविलं नाही. बीएमसीमध्ये निवडणुका होतील. त्यानंतर आमचं सरकार येईल. तेव्हा आम्ही या सर्व घोटाळ्याची आम्ही सखोल चौकशी करू. त्यात काही घोळ झाला तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

दाओसचा खर्च कशासाठी?

दाओसबद्दल दीड लाख कोटींचा आकडा सांगितला जातो. महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम होता. तो १६ ते २९ असा चार दिवसांचा कार्यक्रम ठरला होता. या चार दिवसांत ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कारण सरकारमध्ये खर्च दाखवायचा कसा ते योग्य रीतीने त्यांना माहीत असते, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

खर्च कुठून दाखविणार?

दाओसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. त्यावर दोन ते अडीच कोटी रुपये खर्च झाले असतील. हा खर्चसुद्धा राज्यावर आला आहे. हा खर्च ते एमआयडीसी किंवा उद्योग खात्यातून दाखवतील.
पण, दाओसमध्ये ते उशिरा गेल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. उशिरा जाऊन त्यांनी काय चर्चा केली असेल, असा संशयही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI