AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीत मोठा ‘गेम’ होणार, मनसेचे उमेदवार निश्चित, कुणाकुणाला धक्का बसणार?

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत फार महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. विशेष म्हणजे मनसेकडून आता विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे देखील निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नावांना महायुतीचा पाठिंबा राहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा गेम होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत मोठा 'गेम' होणार, मनसेचे उमेदवार निश्चित, कुणाकुणाला धक्का बसणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 12, 2024 | 7:16 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता प्रत्येक पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या दररोज बैठका घेतल्या जात आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विधानसभेची जोरात तयारी सुरु आहे. शिंदे गटाचीदेखील नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडलीय. भाजपला यश मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट सत्तेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेची अशीच लगबग आता मनसे पक्षातदेखील सुरु आहे. मनसेमध्ये तर लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून हालचाली सुरु होत्या. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. ठाकरेंनी महायुतीसोबत जागावाटपावर चर्चा केली नाही. पण आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांना भाजपकडून भक्कम आश्वासन मिळाल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे या निवडणुकीत महायुतीसोबत राहिले तर त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गेम होऊ शकतो. अर्थात महायुतीत सहभागी व्हायचं की नाही, ते मनसे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते परस्परांशी चर्चा करुन ठरवतीलच. पण राज ठाकरे यांच्या पक्षाकडून काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जवळपास निश्चित करण्यात आले असून तिथे पक्षाकडून जोरदार कामालादेखील सुरुवात करण्ययात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मनसेकडून विधानसभेसाठी काही उमेदवार निश्चित?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून काही विधानसभामधील उमेदवारांची जवळपास निश्चिती करण्यात आली आहे. वरळीमधून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत. तर माहीममधून मनसेचे नेते नितीन सरदेसाई निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मनसेचे सध्याचे एकमेव आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे मनसे नेत्यांकडून या मतदारसंघांमध्ये कामालाही सुरुवात झाली आहे. मनसे स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र काही विधानसभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी आपल्या एका भाषणात यापुढे आपण सत्तेतच राहू, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच दूरगामी परिणाम पडतात का? ते आगामी काळात आता स्पष्ट होणार आहे.

Follow Us
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!