महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावाला स्थायी समितीचा ब्रेक
मुंबई्च्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियावरील खर्चावरुन वादंग निर्माण झाले होते. आज अखेर स्थायी समितीने या प्रस्तावाला ब्रेक लावल्याने महापौरांना झटका बसल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियाच्या खर्चावरुन वाद निर्माण झाला होता. महापौरांच्या सोशल मीडिया अकाऊंटला लाईक्स वाढवावते यासाठी २५ लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीचा प्रस्ताव पालिकेत आल्याने विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. आज अखेर पालिकेच्या स्थायी समिती हा प्रस्ताव नोट टेकन करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाचा महापौर रितू तावडे यांना झटका बसल्याचे म्हटले जात आहे.
जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च २५.१२ लाखाचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. या प्रस्तावावर जोरदार टीका झाल्याने अखेर आजच्या बैठकीत हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर होणारा महापालिकेचा खर्च वाचणार आहे. महापौर बंगला, महापौराची कार, यावरील खर्चावरुन याआधी वाद निर्माण झाले आहेत. आता पुन्हा महापौराच्या सोशल मीडियाचा खर्च जनतेच्या पैशातून करण्याच्या या मुद्यावरुन महायुतीतील शिवसेनेसह विरोधी पक्षाने जोरदार टीका केली होती. हा प्रस्ताव पुन्हा सरकारकडून आणला जाणार आहे का? हे पाहावे लागणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.