शिवाजी पार्कचा चेहरामोहरा बदलणार; न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर होणार विकास

| Updated on: Jan 13, 2021 | 12:12 PM

मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि शिवसेनेच्या आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यांची साक्ष असलेला शिवाजी पार्क (Shivaji park) आता नवं रुप धारण करणार आहे.

शिवाजी पार्कचा चेहरामोहरा बदलणार; न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर होणार विकास
Follow us on

मुंबई : मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि शिवसेनेच्या आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यांची साक्ष असलेला शिवाजी पार्क (Shivaji park) आता नवं रुप धारण करणार आहे. त्यासाठी न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर शिवाजी पार्कचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 6 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला असून येथे वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत सुधारणा केली जाईल. (state government plans to develop the Shivaji park area of Mumbai)

शिवाजी पार्कवर काय बदलणार?

राज्य सरकारने शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी 6 कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. या निधीच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. येथील मैदानातून उठणाऱ्या धुळीचा बाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. तसेच हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात सुधारणा केली जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारून याच पाण्याच्या मदतीने शिवाजी पार्कची माती ओली केली जाईल. त्यामुळे हवेत उठणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, शिवाजी पार्कमैदानावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन तयार करणार केली जाणारआहे.

शिवाजी पार्क मुंबईतील मुख्य भाग असल्यामुळे या परिसरात चाकरमानी आणि इतर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या योजनेंतर्गत पादचाऱ्यांसाठी नवी व्यवस्था तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे शिवाजी पार्क परिसरात हा सर्व बदल करताना सध्या असलेल्या खेळाडुंच्या पॅचेसमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती मिळते आहे.

दरम्यान, 11 मार्च 2020 रोजी दादरमधील शिवाजी पार्कचं नाव बदलून त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं बदलण्यात आलं होतं. हा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला होता.

संबंधित बातम्या :

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर व्ह्यूईंग गॅलरीची उभारणी, समुद्रासह सेल्फीचा आनंद लुटता येणार

शिवाजी पार्क मैदानाचं नाव अखेर बदललं, नावाची अधिकृत पाटी लावली!

(state government plans to develop the Shivaji park area of Mumbai)