मोठी बातमी! सुनील प्रभू यांनी लंच ब्रेकनंतर साक्ष बदलली, शिंदे गटाच्या वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती, काय-काय घडलं?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारले. त्यावर प्रभू यांनी भूमिका मांडली. पण लंचब्रेकनंतर झालेल्या सुनावणीत त्यांनी आपली साक्ष बदलली.

मोठी बातमी! सुनील प्रभू यांनी लंच ब्रेकनंतर साक्ष बदलली, शिंदे गटाच्या वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती, काय-काय घडलं?
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 6:39 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नियमित सुनावणी पार पडली. ही सुनावणी नेहमीप्रमाणे दोन सत्रात पार पडली. या सुनावणीवेळी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेर तपासणी घेतली. यावेळी महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात पाठवण्यात आलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारला. संबंधित पत्र एकनाथ शिंदे यांना कसं पाठवलं? असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला. त्यावर प्रभू यांनी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पाठवल्याचं म्हटलं. त्यावर जेठमलानी यांनी कुणाच्या व्हॉट्सअॅप नंबरवरुन पत्र पाठवलं? असा नवा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपल्याला नीट आठवत नसल्याचं उत्तर दिलं. पण लंच ब्रेकनंतर सुनावणीच्या दुसऱ्याच सत्रात प्रभू यांनी आपली साक्ष बदलली.

एकनाथ शिंदे यांना व्हाट्सअॅप नव्हे तर मेलवर पत्र पाठवलं. मी लंच ब्रेकमध्ये चेक केलं तर पत्र मेलवर पाठवल्याचे आढळले, असा दावा सुनील प्रभू यांनी केली. यावेळी सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपली साक्ष बदलण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली. पण यावेळी जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले.

सुनावणीत नेमके सवाल-जवाब काय?

जेठमलानी – प्रश्न क्रमांक १६५च्या उत्तरात बदल केला आहे. आपण म्हटलं की माहिती घेतली आहे. आपण कुणाकडून माहिती घेतली?

प्रभू – मी माझ्या कार्यालयाकडून माहिती घेतली.

जेठमलानी – आपण ही माहिती व्यक्तिशः कार्यालयात जाऊन घेतली? की फोनवरून घेतली?

प्रभू – माझ्यासोबत माझे सहकारी व सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले. त्यांकडून ही माहिती घेतली

जेठमलानी – तुम्ही स्वतः मेल केला होता का?

प्रभू – मी स्वतः नाही, तर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जोशी आहेत. त्यांना मेल करायला सांगितला होता.

जेठमलानी – आपण लंच ब्रेक दरम्यान जोशी यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा मेल पाठवल्याची खात्री केली का?

प्रभू – होय

जेठमलानी – आपण जोशी यांच्याशी कुठे बोललात?

प्रभू – या इमारतीत बोललो

जेठमलानी – म्हणजे जोशी याठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही त्यांना येथे भेटला?

प्रभू – खाली कार्यालयात, तळमजल्याला. लंच टाईममध्ये दानवे साहेबांच्या केबिनमध्ये मी भोजनासाठी बसलो होतो, तिथे बोलवून मी त्यांना विचारले.

जेठमलानी – तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला ?

प्रभू – मी त्यांना असं विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली असं म्हणालो. पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा. त्यावेळी त्यांना तो मेल आढळला आणि त्यांनी मला सांगितलं.

जेठमलानी – ज्याअर्थी त्यांना हे ईमेल सापडलेले आहेत, तुम्ही एकाच इमारतीत आहात तर तुम्ही त्यांना या ईमेलच्या प्रिंट आऊट का सादर करायला सांगितल्या नाहीत?

प्रभू – मी सांगितले ना तुम्हाला, मी खरं बोललो, मी उद्या तुमच्यासमोर सादर करतो

जेठमलानी – वरच्या उत्तरात तुम्ही जोशी यांची कार्यपद्धती सांगितली आहे. ती तुम्हाला कधी पासून माहीत आहे?

सुनील प्रभू – जेव्हा पासून आमदारांना ईमेल आणि पत्र पाठविण्याची पद्धत सुरु झाली तेव्हापासून

जेठमलानी – जोशी यांचं हे काम आहे हे तुम्हाला कधीपासून माहीत आहे?

प्रभू – जेव्हापासून ईमेल वरती आमदारांना पत्र आणि व्हीप पाठवण्याची पद्धत सुरू झाली तेव्हापासून

जेठमलानी – या प्रथेबाबत 2014 पासून तुम्हाला माहित होतं तर 22 जूनला एकनाथ शिंदे यांना इंग्रजीतून पाठवलेल पत्र ईमेलवरून पाठवलं आहे हे तुम्ही तुमच्या अपत्रता याचिकेत का नाही सांगितल?

प्रभू – रेकोर्डवर आहे

प्रभू – मला सगळ्या पद्धती माहिती आहेत. तुमच्या वांद्रे येथील प्रचार मी केला होता. मी घोषणा देण्यासाठी पुढे होतो. जेठमलानी साहेब आगे बढो. मी तुमचा प्रचार केला आहे. तुमचे प्रचार प्रमुख अनिल परब होते, असं म्हणत सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांना कोपरखळी मारली.

जेठमलानी- हो मला माहिती आहे, तेव्हा युती होती

अध्यक्ष – (उपहासात्कम) म्हणून तर सोपे प्रश्न येत नाही ना?

सुनावणीदरम्यान एकच हास्यकल्लोळ

जेठमलानी – जेवणाच्या सुट्टी दरम्यान असं काय आठवलं की तुम्ही जोशींसोबत बोललात?

प्रभू – पत्र हे वॉट्सपने पाठवलं असं म्हटलं होत. पण माझ्या मनात शंका होती. खरी बाजू पटलावर यावी म्हणून जोशी सोबत बोलून घेतलं.

जेठमलानी – एकनाथ शिंदे यांना जोशी यांनी पाठवलेला ईमेल आता आपण मागवून घेऊ शकता का?

प्रभू – मी उद्या सादर करतो म्हणून बोललो आहे

जेठमलानी – आत्ता जर तुम्ही एकाच इमारतीत आहात तर आत्ता का नाही

प्रभू – सर ते ४ वाजता निघून गेले असतील, म्हणून मी म्हटलं की उद्या सकाळच्या सत्रात सादर करतो

जेठमलानी – जर ते आता असतील, तर विचारून घ्या. उद्यापर्यंत कशाला वाट पाहायची

प्रभू – मी आता लगेच चेक करतो

जेठमलानी – प्रश्न क्रमांक १६५मध्ये आपण काही चूक केलेली आहे, हे आपल्याला आठवले नाही तर ते त्या प्रश्नाचे स्वरूप बदलण्यासाठी आपणास सांगितले आहे

प्रभू – हे खोटे आहे

जेठमलानी – प्रतिवादी भाजपशी संगनमत करून काम करत नव्हते, तर भाजपशी असलेल्या प्रदीर्घ संबंधांनंतर काम करत होते. कारण प्रतिवाद्यांचे भाजपशी चांगले संबंध होते.

प्रभू – हे खरे नाही.

जेठमलानी – पॅरा 51 मध्ये Respondent ( एकनाथ शिंदे ) यांच्या बाबत उल्लेख आहे ते 21 जून 22 पासून पक्ष विरोधी करवायांमध्ये गुंतलेले नव्हते

प्रभू – हे खोट आहे

जेठमलानी – 51 मध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते शिवसेनाच्या हितार्थ काम करत होते. कारण निवडणूक पूर्व युती फायद्याची आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मतदारांचा विश्वासघात करणारी आहे

प्रभू – हे खोटं आहे

जेठमलानी – प्रतिवादी भाजपशी संगनमत करून काम करत नव्हते ते भाजपशी असलेल्या संबंधातून काम करत होते. प्रतिवादी यांचे भाजपच्या अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते

प्रभू – हे खरं नाही.

जेठमलानी – 52 मध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते आमदार चुकीचे वागले नाहीत

प्रभू – हे खोटं आहे

जेठमलानी – परिच्छेद 52 मध्ये उल्लेख केलेल्या आमदारांनी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही.

प्रभू – चुकीचं म्हणजे काय?

अध्यक्ष – ज्या आमदारांचा उल्लेख परिच्छेद 52 मध्ये केला आहे ते आमदार चुकीचं वागले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे.

प्रभू – हे खोटं आहे.

जेठमलानी – पॅरा 53 पहा, 25 जून 22 ला अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलेल्या पत्राचा चुकीच्या तथ्यांवर आधारित आहे

प्रभू – हे खोटं आहे

दरम्यान, 22 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना पाठवलेला मेल ठाकरे गटाच्या वतीने सादर करण्यात आला जो विधिमंडळ पक्ष कार्यालय सचिव विजय जोशी यांनी पाठवला होता. त्याची कॉपी अध्यक्षांसमोर ठेवली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी संपली. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होईल.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...