Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, आता शिंदे गटाची उलट तपासणी, विधानसभा अध्यक्षांसमोर काय-काय घडणार?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून नियमित सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम सुरु होतं. सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाची फेर तापसणी होणार आहे.

सर्वात मोठी बातमी, आता शिंदे गटाची उलट तपासणी, विधानसभा अध्यक्षांसमोर काय-काय घडणार?
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 4:22 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नियिमित सुनावणी घेत आहेत. विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिलाय. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर विधान भवनाच्या सभागृहात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीवेळी दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जातोय. या प्रकरणी निर्णय घेण्याचा कालावधी ठरवून दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातही सुनावणी घेणार आहेत. हिवाळी अधिवेशन हे नेहमीप्रमाणे नागपुरात भरवलं जातं. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात सुनावणी घेणार आहेत. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अधिवेशनानंतर दोन दिवस नागपूरला सुनावणी घेणार आहेत.

राहुल नार्वेकर यांनी याच विषयावर दोन्ही गटाच्या वकिलांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी 12 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी असेल. 20 डिसेंबरनंतर 21 आणि 22 डिसेंबरला तात्काळ कागदपत्रे मुंबईला आणणे कठीण आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 21 आणि 22 डिसेंबरची सुनावणी नागपूरला घेण्याच्या विचारात आहेत.

आता शिंदे गटाची उलट तपासणी होणार

सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी हे सध्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवत आहेत. पण आता ठाकरे गटाची उलट तपासणी पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची उलट तपासणी उद्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेच शिंदे गटाची उलट तपासणी होणार आहे. 1, 2,7,8 डिसेंबर या तारखेदरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी होणार आहे. या प्रकरणी आता 11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावणीसाठी 21, 22 डिसेंबर हे अधिकचे दोन दिवस दिले जाण्याची शक्यता आहे.

सुनील प्रभू यांनी साक्ष बदलली

आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना एका पत्राबाबत प्रश्न विचारला. सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात पत्र जोडलंय. याच पत्राबद्दल जेठमलानी यांनी प्रश्न विचारला. हे पत्र एकनाथ शिंदे यांना कसं पाठवलं? असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर प्रभू यांनी व्हॉट्सअॅप पत्र पाठवल्याचं सांगितलं. तसेच याबाबत आणखी संक्षिप्त प्रश्न विचारल्यावर हे पत्र आपल्या मोबाईलवरुन की पक्षाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवरुन पाठवलं का? हे आपल्या लक्षात नसल्याचं प्रभूंनी सांगितलं. पण लंच ब्रेकनंतर झालेल्या सुनावणीवेळी प्रभू यांनी आपली साक्षच बदलली.

एकनाथ शिंदे यांना पत्र व्हॉट्सअॅप नव्हे तर मेलवर पाठवले, असा दावा सुनील प्रभू यांनी केला. यावेळी सुनील प्रभू यांनी आपली साक्ष बदलण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली. दरम्यान, वकील जेठमलानी यांनी प्रभू यांच्याकडे व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवल्याचे पुरावे मागितले होते.

'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर.
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले.
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट.