AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajan-Dawood : छोटा शकील नाही, तर या दोन जणांनी छोटा राजन विरोधात दाऊदचे कान भरले म्हणून त्यांच्यात फाटलं

Chhota Rajan-Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निर्णयामुळे छोटा राजन त्याच्यापासून वेगळा झाला असं बोललं जात. पण ते एकमेव कारण नाहीय. त्याआधी अशा काही घटना घडलेल्या त्यामुळे राजन दाऊदवर नाराज होता. दाऊदकडे राजन विरोधात कोणी कान भरले? जाणून घ्या ती माहिती.

Rajan-Dawood : छोटा शकील नाही, तर या दोन जणांनी छोटा राजन विरोधात दाऊदचे कान भरले म्हणून त्यांच्यात फाटलं
Dawood Ibrahim against Chhota RajanImage Credit source: social media
| Updated on: Apr 25, 2026 | 3:05 PM
Share

छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम ही मुंबई अंडरवर्ल्डमधली दोन मोठी नावं आहेत. आज अंडरवर्ल्डचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात आलाय. पण 90 च्या दशकात मुंबईचे रस्ते या अंडरवर्ल्डमधील आपसातील दुश्मनीने रक्तरंजित झाले होते. त्यावेळी टोळी युद्धाने टोक गाठलं होतं. मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पडायचा. दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक, माया डोळस ही मुंबई अंडरवर्ल्ड मधली मोठी नावं. त्यांच्या नावाची दहशत होती. सर्वसामान्यांपासून ते बडे बडे हॉटेल व्यावसायिक, बिल्डर, व्यापारी, उद्योजक मुंबई अंडरवर्ल्ड समोर गुडघे टेकायचे. मटका, खंडणी, हप्ता, प्रोटेक्शन मनी, फिल्म फायनान्स हे अंडरवर्ल्डचे कमाईचे मार्ग होते. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन या दोन नावांशिवाय मुंबई अंडरवर्ल्ड कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आजही हे दोन डॉन जिवंत आहेत. राजन तिहार तुरुंगात आहे, तर दाऊद पाकिस्तानात लपून बसलाय.

दाऊदने डोंगरी तर छोटा राजनने चेंबूरमधून आपल्या गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. छोटा राजन आधी चित्रपटांची तिकीट ब्लॅकने विकायचा. दाऊद स्मगलर होता. हळूहळू दहशत आणि हुशारी याचा वापर करत दोघांनी गुन्हेगारी विश्वात आपली पाळंमूळं पक्की केली. छोटा राजन आणि दाऊद आधी एकत्र होते. छोटा राजन दाऊदसाठी काम करायचा. पण 1993 च्या बॉम्ब स्फोटानंतर दोघे वेगळे झाले. दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली. त्यात शेकडो हिंदू मारले गेले. दाऊदचं हे निर्घृण कृत्य राजनला पटलं नाही, म्हणून दाऊद पासून राजन वेगळा झाला असं बोललं जातं. छोटा राजन दाऊदपासून वेगळं होण्याचं हे एक कारण असलं तरी त्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे.

जेजेच्या शूट आऊटपासून राजनला लांब ठेवलं

डी गँगमध्ये छोटा राजनला टक्कर देणारे काही स्पर्धक तयार झालेले हे सुद्धा राजन दाऊदपासून फुटून वेगळं निघण्याचं एक कारण आहे. 1992 सालच्या मुंबईतील जेजे रुग्णालयातील शूटआऊटची आजही चर्चा होते. दाऊदची बहिण हसीना पारकरच्या नवऱ्याची हत्या झालेली. ते मारेकरी जेजे रुग्णालयात दाखल होते. दाऊदने परदेशात बसून जेजे रुग्णालयात शूट आऊट घडवून आणलं. त्याने या सर्व मारेकऱ्यांची हत्या केली. आजही या शूट आऊटची चर्चा होते. छोटा राजनला या जेजेच्या शूट आऊटपासून लांब ठेवण्यात आलेलं. या शूट आऊटची जबाबदारी दाऊदने सुनील सावंत ऊर्फ सावत्यावर सोपवलेली.

दुश्मनीची खरी सुरुवात तिथे झाली

सुनील सावंत ऊर्फ सावत्या आणि शरद शेट्टी यांचा डी कंपनीत उदय होण्याआधी छोटा राजनच्या शब्दाला महत्व होतं. राजनला डी कंपनीचं होम मिनिस्टर म्हटलं जायचं. हळूहळ सावत्या आणि शरद शेट्टीने दाऊदचे राजन विरोधात कान भरायला सुरुवात केली. त्यानंतर राजनच्या जवळच्या माणसांच्या हत्येचा खेळ सुरु झाला. यात दिवाकर चुरी आणि अमर, संजय रगड यांची हत्या हा राजनला धक्का होती. हे सगळे छोटा राजनचे खास होते. खंरतर छोटा राजन आणि दाऊजच्या दुश्मनीची सुरुवात तिथे झालेली.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ