भावाच्या लग्नाला जावंच लागणार, अमितच्या लग्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा 27 जानेवारीला विवाह आहे. राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलंय. पण अमित यांचे चुलत भाऊ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे लग्नाला जाणार का, याबाबत तरुणांमध्ये चर्चा होती. पण लग्नाला मी नक्की जाणार असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलंय. […]

भावाच्या लग्नाला जावंच लागणार, अमितच्या लग्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा 27 जानेवारीला विवाह आहे. राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलंय. पण अमित यांचे चुलत भाऊ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे लग्नाला जाणार का, याबाबत तरुणांमध्ये चर्चा होती. पण लग्नाला मी नक्की जाणार असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलंय.

ठाकरे कुटुंबाची नवी पिढी अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल तरुणाईमध्ये नेहमीच आकर्षण असतं. आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेही आता राजकारणात सक्रिय होत आहेत. पण ठाकरे कुटुंबीयांचे राजकीय संबंध टोकाचे असल्यामुळे कौटुंबीक संबंधांवरही याचा परिणाम जाणवतो.

आदित्य ठाकरे यांना अमितच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “अमितच्या लग्नाला नक्की जाणार, जायलाच लागणार. यामध्ये कोणतंही राजकारण नाही”.

राज ठाकरे सध्या अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी विविध नेत्यांची भेट घेत आहेत. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लग्नाची पत्रिका दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्रिका देण्यासाठीही राज ठाकरे दिल्लीला जाणार होते, पण दिल्ली दौरा त्यांनी रद्द केला.

अमितचं लग्न 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. राज ठाकरे यांनी काल अमितची लग्नपत्रिका नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.