AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SPECIAL REPORT | तीन मिमिक्री..3 गुन्हे..अंधारे-जाधव-राऊत अडचणीत?

भाषणांमध्ये नेत्यांच्या नक्कला करण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र त्यावर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण अलीकडे सुरु झालंय.

SPECIAL REPORT | तीन मिमिक्री..3 गुन्हे..अंधारे-जाधव-राऊत अडचणीत?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 12, 2022 | 9:35 PM
Share

अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई : जाहीर भाषणातल्या नक्कलीमुळे ठाकरे गटाच्या 3 नेत्यांवर गुन्हे  दाखल (Crimes filed against the leaders) झाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांवर. (Bhaskar Jadhav) पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare), आणि नाव न घेता राणेंवर विखारी टीका केल्याप्रकरणी खासदार विनायक राऊतांवर गुन्हा दाखल झालाय. या तिन्ही नेत्यांसहीत मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी महाप्रबोधन यात्रेत भाषणं केली होती.त्या सभेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाण्याच्या नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाषणांमध्ये नेत्यांच्या नक्कला करण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र त्यावर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण अलीकडे सुरु झालंय. याआधी राज ठाकरेंनी अनेकदा पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती. तेव्हा गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा प्रश्न सुषमा अंधारेंनी केलाय.

सुषमा अंधारेंच्या भाषणाआधी भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नक्कल केली, आणि त्यानंतर ज्याप्रकारे भाजप नेते गिरीश महाजनांनी पेपरचा आडोशा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तरं सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचीही भास्कर जाधवांनी नक्कल केली.

भास्कर जाधवांनी याआधी सभागृहात आणि त्यानंतर यंदा झालेल्या दसरा मेळाव्यातही नारायण राणेंची नक्कल केली होती. त्याआधी सभागृहात जाधवांनी मोदींची केलेली नक्कलही वादात आली. तेव्हा भाजप नेत्यांनी ते शब्द मागे घेण्याची मागणी लावून सभागृह बंद पाडलं होतं.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे वगळता सुषमा अंधारे आणि भास्कर जाधवांच्या टार्गेटवर नारायण राण होते.मात्र आता महाप्रबोधन यात्रेत खासदार विनायक राऊतांनी राणेंवर केलेली टीकाही वादात आलीय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...