AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताजमध्ये चहा प्यायचा असेल तर किती पैसे मोजावे लागतात?; तेवढ्या पैशात तुम्ही…

ताज हॉटेलमध्ये साधा चहा 350 रुपयांपासून सुरू होतो, तर लक्झरी चहा कॉम्बो 1800 रुपयांपर्यंत मिळतो. इन्स्टाग्रामवर एका यूजर्सने या चहाची माहिती दिली आहे आणि चहाला 5 पैकी 3 स्टार दिले आहेत. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल एक प्रमुख लक्ष्य होते, या घटनेचा हॉटेलच्या इतिहासात एक महत्त्वाचा भाग आहे. हॉटेलची भव्यता आणि चहाची किंमत यांच्यातील विरोधाभास हा या लेखातून अधोरेखित करण्यात आला आहे.

ताजमध्ये चहा प्यायचा असेल तर किती पैसे मोजावे लागतात?; तेवढ्या पैशात तुम्ही...
Taj
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:48 PM
Share

प्रत्येकाला मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहण्याची इच्छा असते. निदान काही तरी खाता आलं पाहिजे किंवा काही तरी पिता आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण खिशात तेवढा पैसा नसल्याने काही करता येत नाही. कारण लक्झरी हॉटेल्समध्ये जेवणासोबत डाइनिंग अनुभवासाठीही पैसे घेतले जातात. अनेक बड्या हॉटेलात बाहेर साधारणतः 10 रुपयाला मिळणारी चहा 100 रुपयांना मिळते. भारतातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सपैकी एक म्हणजे मुंबईतील ताज हॉटेल. तुम्हाला ताज हॉटेलमध्ये चहा कितीला मिळतो हे माहीत आहे का?

किमत किती?

मुंबईची शान असलेल्या आणि देशातील प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमध्ये साधारणपणे 350 रुपयांपासून चहाची किंमत सुरु होते. 350 रुपयांचा चहा हा ताज मधला साधा चहा आहे, पण तुम्ही हर्बल चहा, मसाला चहा किंवा नॅचरल चहा ऑर्डर करू शकता. 350 रुपयांपासून विविध प्रकारचे चहा आणि चहा कॉम्बो उपलब्ध आहेत. ताज हॉटेलमधील प्रसिद्ध लक्झरी चहा डिशची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. टॅक्ससह या चहा कॉम्बोची किंमत 2124 रुपये होते. ‘बॉम हाई टी’ असे या चहाचे नाव आहे. ही एक चहा कॉम्बो आहे, ज्यामध्ये चहा सोबत वडा पाव, ग्रिल्ड सँडविच, काजू कतली आणि विविध प्रकारचे स्नॅक्स मिळतात.

रेटिंग काय?

आद्नान पठान या यूजर्सने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. आद्नानचे ताज हॉटेलमधून ‘बॉम हाई टी’ चहा घेतलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओत आद्नान ताज हॉटेलचा आतला भाग दाखवतो. हॉटेल पाहून मला किल्ल्यात असल्यासारखे वाटले, असं तो म्हणताना दिसतो. चहा घेतल्यावर तो म्हणतो, जीवनात कधी तरी हा अनुभव घ्याच. चहा आणि स्नॅक्स उपलब्ध असले तरी आद्नानच्या मते चहा बरा होता. त्याने या चहाला 5 पैकी 3 रेटिंग दिले आहेत. विशेष म्हणजे नेटिझन्सही त्याची ही रेटिंग्ज मान्य करत आहे.

दहशतवाद्यांचा हल्ला

गेटवे ऑफ इंडियाजवळ ताज महल पॅलेस किंवा ताज हॉटेल हे पंचतारांकित लक्झरी हॉटेल आहे. 1903 मध्ये जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल बांधले. या हॉटेलमध्ये 500 पेक्षा अधिक रूम्स आहेत आणि 1600 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे मुख्य केंद्र ताज हॉटेल होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी हा हल्ला झाला. हल्ला लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाने केला होता. हल्ल्यात 167 जणांचा मृत्यू झाला. तीन दिवस हा हल्ला सुरू होता. अखेर 29 नोव्हेंबर 2008 रोजी भारतीय लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. काही यावेळी काही जवान शहीद झाले होते. त्यामध्ये माजी मेजर संदीप उन्निकृष्णन हे एक होते. हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये 450 हून अधिक लोक होते. त्यातले 31 जण हॉटेलमध्येच मरण पावले होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.