
प्रत्येकाला मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहण्याची इच्छा असते. निदान काही तरी खाता आलं पाहिजे किंवा काही तरी पिता आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण खिशात तेवढा पैसा नसल्याने काही करता येत नाही. कारण लक्झरी हॉटेल्समध्ये जेवणासोबत डाइनिंग अनुभवासाठीही पैसे घेतले जातात. अनेक बड्या हॉटेलात बाहेर साधारणतः 10 रुपयाला मिळणारी चहा 100 रुपयांना मिळते. भारतातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सपैकी एक म्हणजे मुंबईतील ताज हॉटेल. तुम्हाला ताज हॉटेलमध्ये चहा कितीला मिळतो हे माहीत आहे का?
मुंबईची शान असलेल्या आणि देशातील प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमध्ये साधारणपणे 350 रुपयांपासून चहाची किंमत सुरु होते. 350 रुपयांचा चहा हा ताज मधला साधा चहा आहे, पण तुम्ही हर्बल चहा, मसाला चहा किंवा नॅचरल चहा ऑर्डर करू शकता. 350 रुपयांपासून विविध प्रकारचे चहा आणि चहा कॉम्बो उपलब्ध आहेत. ताज हॉटेलमधील प्रसिद्ध लक्झरी चहा डिशची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. टॅक्ससह या चहा कॉम्बोची किंमत 2124 रुपये होते. ‘बॉम हाई टी’ असे या चहाचे नाव आहे. ही एक चहा कॉम्बो आहे, ज्यामध्ये चहा सोबत वडा पाव, ग्रिल्ड सँडविच, काजू कतली आणि विविध प्रकारचे स्नॅक्स मिळतात.
आद्नान पठान या यूजर्सने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. आद्नानचे ताज हॉटेलमधून ‘बॉम हाई टी’ चहा घेतलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओत आद्नान ताज हॉटेलचा आतला भाग दाखवतो. हॉटेल पाहून मला किल्ल्यात असल्यासारखे वाटले, असं तो म्हणताना दिसतो. चहा घेतल्यावर तो म्हणतो, जीवनात कधी तरी हा अनुभव घ्याच. चहा आणि स्नॅक्स उपलब्ध असले तरी आद्नानच्या मते चहा बरा होता. त्याने या चहाला 5 पैकी 3 रेटिंग दिले आहेत. विशेष म्हणजे नेटिझन्सही त्याची ही रेटिंग्ज मान्य करत आहे.
गेटवे ऑफ इंडियाजवळ ताज महल पॅलेस किंवा ताज हॉटेल हे पंचतारांकित लक्झरी हॉटेल आहे. 1903 मध्ये जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल बांधले. या हॉटेलमध्ये 500 पेक्षा अधिक रूम्स आहेत आणि 1600 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे मुख्य केंद्र ताज हॉटेल होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी हा हल्ला झाला. हल्ला लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाने केला होता. हल्ल्यात 167 जणांचा मृत्यू झाला. तीन दिवस हा हल्ला सुरू होता. अखेर 29 नोव्हेंबर 2008 रोजी भारतीय लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. काही यावेळी काही जवान शहीद झाले होते. त्यामध्ये माजी मेजर संदीप उन्निकृष्णन हे एक होते. हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये 450 हून अधिक लोक होते. त्यातले 31 जण हॉटेलमध्येच मरण पावले होते.