AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Mumbai Marathon 2024 : तरूण, ज्येष्ठ नागरिक सारे सारे धावले… पण पहिलं कोण आलं? पाहा…

Tata Mumbai Marathon 2024 Result : मुंबई मैरॉथॉन मध्ये जय श्रीराम गाण्याची धूम पाहायला मिळाली. मुंबई मॅरेथॉनमध्ये जय श्री रामाचे नारे देण्यात आले. हाती भगवा झेंडा घेऊन शंक नाद करत स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या ड्रीम रनमधील स्पर्धकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Tata Mumbai Marathon 2024 : तरूण, ज्येष्ठ नागरिक सारे सारे धावले... पण पहिलं कोण आलं? पाहा...
| Updated on: Jan 21, 2024 | 12:39 PM
Share

मुंबई | 21 जानेवारी 2024 : मुंबईमध्ये आज टाटा मॅरेथॉन पार पडली. दरवर्षी प्रमाणे या यावर्षी ही मुंबई टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देश विदेशातील हजारो नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी नोंदवला आहे. माहीम रेती बंदर इथून हॉफ मॅरेथॉनला सुरवात झाली. माहीम-वरळी सीलिंक -हाजी आली करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ही मॅरेथॉन संपली. एकूण 21 किलोमीटरची ही रण होती. त्यासाठी आता हजारो स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला.  यात सहभागी झालेल्यांनी 10 किलोमीटर अंतर धावत पार केलं. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं हे 19 वं वर्षं आहे.

मुंबईत टाटा मॅरेथॉन

आज मुंबईत सकाळी ही मॅरेथॉन पार पडली. 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनला सकाळी 5 वाजता सुरवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ह्या आजच्या पहिल्या मोठ्या फुल मॅरेथॉनला झेंडा दाखवला आहे. मुंबई मॅरेथॉन ही मुंबईची जाण आहे. स्पर्धकांचं स्पिरीट पाहायला मिळत आहे. मी सध्या व्यायाम करतो पण धावायला वेळ मिळत नाही. माझी सध्या वेगळी रन सुरु आहे. यंदा सुरु असलेली ड्रीम रन संपली की, पुढच्या वर्षी धावण्याच्या प्रयत्न करेन, असं राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.

जय श्रीरामची घोषणा

ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉन पार पडली. यामध्ये 1 हजार 10 पुरुष तर 722 महिलांनी सहभाग घेतला. मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मॅरेथॉनला मिळत आहे. अनेकांच्या हातात श्रीरामाचे झेंडे देखील पाहायला मिळत आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये ड्रीम रनच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश स्पर्धकांकडून दिले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन चक्क श्रीराम-लक्ष्मणच्या वेशभूशेत स्पर्धक अवतरले आहेत.

मुंबई मॅरेथॉनमध्ये जय श्रीराम गाण्याची धूम पाहायला मिळाली. मुंबई मॅरेथॉनमध्ये जय श्री रामाचे नारे देण्यात आले. हाती भगवा झेंडा घेऊन शंक नाद करत स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या ड्रीम रनमधील स्पर्धकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ विजेते

पूर्ण मॅरेथॉन (पुरुष)

१) हायली लेमी, २:०७:५० इथोपिआ

२) हेमानॉट अल्यू, ०२:०९:०३ इथोपिआ

३) मित्कु तफा, ०२:०९:५८ इथोपिआ

पूर्ण मॅरेथॉन (महिला)

१) अबेराश मिनसिवो, ०२:२६:०६ इथोपिआ

२) मूलूअबट तेसगा, ०२:२६:५१ इथोपिआ

३) मेधिन बेजेनी, ०२:२७:३४ इथोपिआ

पूर्ण मॅरेथॉन (भारतीय गट)

१) श्रिनु बुगाथा, २:१७:२९

२) गोपी थोनकल, २:१८:३७

३) शेरसिंह तन्वर, २:१९:३७

अर्ध मॅरेथॉन (पुरुष)

१) सावन बरवाल

१तास ५ मिनटे ७ सेकंद

२) किरण म्हात्रे

१ तास ६ मिनटे २३ सेकंद

३) मोहन सैनी

१ तास ६ मिनटे ५५ सेकंद

अर्ध मॅरेथॉन (महिला)

१) अमरीता पटेल,

१ तास १९ मिनटे २० सेकंद

२) पूनम दिनकर

१ तास १९ मिनटे २० सेकंद

३) कविता यादव

१ तास २० मिनटे ४५ सेकंद

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.