AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेच न्याय देऊ शकतात, शिक्षिकांचा ‘मातोश्री’त घुसण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबई महापालिकेवर सलग पाचवेळा महानगरपालिकेवर सत्ता असूनही मराठी शाळा वाचवण्यात शिवसेनेला अपयश आलं आहे. अखेर या शाळा वाचवण्यासाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजेच ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केलं. उद्धव ठाकरे यांना भेटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षिकांनी घेतली. काहीच प्रतिसाद उद्धव ठाकरेंकडून मिळत नसल्याने अखेर शिक्षिकांनी ‘मातोश्री’त घुसण्याचा […]

उद्धव ठाकरेच न्याय देऊ शकतात, शिक्षिकांचा 'मातोश्री'त घुसण्याचा प्रयत्न
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेवर सलग पाचवेळा महानगरपालिकेवर सत्ता असूनही मराठी शाळा वाचवण्यात शिवसेनेला अपयश आलं आहे. अखेर या शाळा वाचवण्यासाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजेच ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केलं. उद्धव ठाकरे यांना भेटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षिकांनी घेतली. काहीच प्रतिसाद उद्धव ठाकरेंकडून मिळत नसल्याने अखेर शिक्षिकांनी ‘मातोश्री’त घुसण्याचा प्रयत्न केला.

विनाअनुदानित शाळांना नंतर अनुदान देण्यात येईल, या अटीवर मान्यता देण्यात आली आहे. अशा शाळा गेल्या 15 ते 25 वर्ष सुरु असल्या तरी या शाळांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांनी आझाद मैदानात 22 दिवस आंदोलन केलं. मात्र, शासन-प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे अखेर शिक्षिकांनी आज सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

पाहा व्हिडीओ :

महापौर काय म्हणाले?

“आम्ही आमच्या अधिकारात असलेला काम पूर्ण केले आहेत. गटनेत्याच्या बैठकीत सुद्धा अनुदानाला आम्ही मंजुरी दिली आहे. राज्य शासनमुळे हे अनुदान अडलं आहे. राज्य शासन आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहे. शिक्षणमंत्र्यांनी अजूनही याबाबत बैठकीला वेळ दिलेला नाही. आम्ही स्वतः शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा केली. पण अद्याप बैठक झालेली नाही.”, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

तसेच, “राज्य शासनाने 50 टक्के प्रतिपूर्तीही या खाजगी विनाअनुदातीत शाळांना देणं बंद केलं आहे. त्यामुळे महापलिकेला या शाळांना अनुदान देणं कठीण झालं आहे. त्यामुळे बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. राज्य शासन आणि आम्ही याबाबत सकारात्मक आहोत, लवकर तोडगा निघेल अशी अशा आहे.”, असेही महापौर म्हणाले.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.