AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्याचा का वाढला इतका पारा? भयंकर दुष्काळ, उष्णतेच्या तीव्र झळा, सुपर अल-निनोमुळे का पडला देश काळा-निळा

Super El Nino: देशात आणि राज्यात सूर्य आग ओकत आहे. देश जणू काळा निळा झाला आहे. उष्माघाताचे अनेक रुग्ण दाखल होत आहे. दुपारी रस्त्यावर शुकशुकाट आहे. काय आहे हे Super El Nino?

सूर्याचा का वाढला इतका पारा? भयंकर दुष्काळ, उष्णतेच्या तीव्र झळा, सुपर अल-निनोमुळे का पडला देश काळा-निळा
सूर्य का ओगतोय आगImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 28, 2026 | 4:25 PM
Share

Super El Nino: चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. एप्रिलच्या अखेरीसच तापमानात मोठी वाढ झाली असून मे महिन्यातही उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी अमरावतीचा पारा 46 अंशाच्या जवळपास आहे. काल विदर्भात सर्वाधिक अमरावती चे तापमान 46.6° इतके होते. मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून आजही तापमानाने चाळिशी पार केली आहे. नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आज मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होते. परभणी आणि नांदेड येथे सर्वाधिक सुमारे 42°C तापमान होते. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बीड येथे तापमान 41°C च्या आसपास राहील. तर जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही पारा 40°C च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत “रिअल फील” तापमान तब्बल 44°C पर्यंत पोहोचत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे. यासोबतच उष्ण आणि कोरडे वारे म्हणजेच ‘लू’ देखील वाहत आहेत. सूर्य आग ओकत असल्याने देश जणू काळा निळा पडला आहे. काय आहे हे Super El Nino?

अल निनो आणि सुपर अल निनो आहे तरी काय?

अल निनो ही एक नैसर्गिक घटना आहे. अल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागरातून होते. भूमध्ये रेषेच्याजवळून अल निनो तयार होते. जेव्हा समुद्राचे पाणी अधिक उष्ण, गरम होते. तेव्हा अल निनो तयार होतो. त्याचा परिणाम केवळ समुद्रापूरता मर्यादित नसतो. त्याचा संपूर्ण जगातील हवामानावर परिणाम होतो. जेव्हा तापमान हे 2 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होते. तेव्हा त्याला सुपर अल निनो असे म्हणतात.

भारतावर मोठा परिणाम

अल निनो साधा असेल तर त्याचा परिणाम पावसावर होतो. पाऊस कमी होण्याची दाट शक्यता असते. पण जर सुपर अल निनो असेल तर पावसाचे प्रमाण वाढते. देशभरात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता असते. पण सुपर अल निनो दीर्घकाळ असेल तर भयंकर दुष्काळ पडण्याची भीती वाढते. त्यासोबतच उष्णतेने आगीच्या घटनांमध्ये आणि पाणी साठे संपूर्ण सुखण्याची भीती असते. भारतात वर्ष 1982-83, 1997-98 आणि 2015-16 या काळात सुपर अल निनोचा प्रभाव दिसला.

अल निनो हे नाव आले कुठून?

अल निनो हे स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. त्याला अल निनो असे म्हणतात. त्याचा अर्थ लहान मुलं असा होतो. पेरू आणि इक्वाडोर या देशातील मासेमारी करणाऱ्यांमध्ये हा शब्द प्रचलित आहेत. अचानकपणे समुद्राचे पाणी अपेक्षेपेक्षा जास्त गरम होते आणि सुपर अल निनोचा धोका वाढतो. समुद्र गरम, उष्ण होण्याची घटना ही ख्रिसमसच्या जवळपास सुरू होते. त्यामुळे त्याला एल निनो असे म्हटले जाते. यशू ख्रिस्त यांच्या बालपणाशी त्याचा संबंध जोडल्या जातो.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप