हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता, महाविकास आघाडी आक्रमक होणार?

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 9:40 PM

या सर्व वक्तव्यावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर वारंवार टीका होत आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता, महाविकास आघाडी आक्रमक होणार?
राज्यपाल कोश्यारी

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बदलण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याची माहिती आहे. 5 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान राज्यपालांच्या बदलीची शक्यता आहे. पाच डिसेंबरला गुजरात विधानसभा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात जोरदार भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श असल्याचं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं.महात्मा फुले यांच्या बालविवाहावरूनही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. गुजराती-राजस्थानी नसते तर मुंबईत पैसा आला नसता असंही राज्यपाल कोश्यारी यांनी म्हंटलं होतं. हिंदुत्व सोडलं का, ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्यपाल कोश्यारी यांनी तसं पत्र लिहिलं होतं.

या सर्व वक्तव्यावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर वारंवार टीका होत आहे. प्रसंगी राज्यापाल कोश्यारी यांनी माफीही मागितली आहे. पण, कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यामुळं राज्यपाल कोश्यारी यांना परत बोलविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज आहेत. अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांना केंद्र सरकार परत बोलावू शकत. येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रामुख्यानं महाविकास आघाडी उचलण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI