AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवला!

अजय शर्मा, टीव्ही 9, मराठी, अंबरनाथ : अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. या ट्रकमध्ये सुमारे 5 लाख रुपयांची अंडी होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चोरीला गेलेली अंडी, ट्रक आणि चोरांचा शोध सुरु केला आहे. कर्नाटक राज्यातून कोंबडीची अंडी घेऊन निघालेल्या ट्रकला अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास चार […]

अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवला!
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

अजय शर्मा, टीव्ही 9, मराठी, अंबरनाथ : अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. या ट्रकमध्ये सुमारे 5 लाख रुपयांची अंडी होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चोरीला गेलेली अंडी, ट्रक आणि चोरांचा शोध सुरु केला आहे.

कर्नाटक राज्यातून कोंबडीची अंडी घेऊन निघालेल्या ट्रकला अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास चार जणांच्या टोळीने अडवलं. ट्रकचालकासह त्याच्या मुलाला मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये नेऊन टिटवाळा परिसरातील जंगलात सोडून दिलं. त्यानंतर चोरटे ट्रक घेऊन फरार झाले आहे.

कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर येथून मोहमंद नबी उस्मानसाहेब शेख (वय 44 वर्षे) हा ट्रकचालक त्याचा मुलगा मुजम्मिल (वय 17 वर्षे) याच्यासोबत अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन अंबरनाथकडे निघाले होते. या ट्रकमध्ये 4 हजार 700 ट्रे कोंबडीची अंडी होती. म्हणजेच, सुमारे 1 लाख 41 हजार नग 5 लाख रुपये किंमतीची अंडी होती. महाराष्ट्र एग्ज सेंटर यांच्यापर्यंत अडी पोहोचवायची होती.

पहाटेच्या सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथील टी सर्कल ग्रीनसीटीच्या बाजूने येत असताना ट्रकच्या पाठीमागून कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने तो ट्रक थांबवला. त्यांनी ट्रकचालक मोहमंद शेख व त्यांचा मुलगा यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्याला कापडी रुमाल बांधून त्यांच्या खिशातील दोन हजारांची रोख रक्कम, मोबाईल फोन प्रथम काढून घेतला आणि त्या दोघांना जबरदस्तीने कारमधून नेवून टिटवाळा परिसरातील रायता येथील निर्जन स्थळी जंगलात  सोडले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासही सुरु करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.