Mumbai Local : रि-गर्डरिंगच्या कामामुळे हार्बर लाइनवरच्या प्रवाशांचा खोळंबा
मुंबई : हार्बर मार्गा(Harbor line)वरील सँडहर्स्ट रोड स्थानकावर रि-गर्डरिंगचं काम सुरू असल्यानं लोकल गाड्या काही काळ बंद होत्या. त्यामुळे हार्बर लाइनवरच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. दरम्यान, थोड्याच वेळात लोकल सुरू होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी दिली. Mega block on Harbor line: The work of re-girdering at Sandhurst road […]

मुंबई : हार्बर मार्गा(Harbor line)वरील सँडहर्स्ट रोड स्थानकावर रि-गर्डरिंगचं काम सुरू असल्यानं लोकल गाड्या काही काळ बंद होत्या. त्यामुळे हार्बर लाइनवरच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. दरम्यान, थोड्याच वेळात लोकल सुरू होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी दिली.
Mega block on Harbor line:
The work of re-girdering at Sandhurst road station on Harbor line is in progress and it may take another 90 to 100 mins to complete this work.
Harbor line Passengers are requested to bear with the Railway administration for the inconvenience caused.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) December 19, 2021
सेंट्रलवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेकडून आज ठाणे ते दिवा कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. यादरम्यान ठाणे ते दिवा मार्गावरील लोकलसेवा तब्बल 18 तासांसाठी बंद राहणार असल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलं. सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल सेवा ठप्प राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं काम सुरू असल्यानं या कारणास्यातव हा मेगाब्लॉक घेण्यात आला. एकीकडे मध्ये रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला तर हार्बरवर गर्डरचं काम असल्यानं तिथंही लोकल सेवा ठप्प होती. ऐन सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले. बाहेरगावाहून आलेल्या तसेच कामानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कोविडमुळे आधीच अनेक निर्बंध आहेत. त्यात आणखी भर घालू नये, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.
